शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:29 IST

स्मार्टफोन आणि क्रोमबुकच्या बाजारपेठेत आपले वर्चस्व गाजवल्यानंतर आता गूगल पारंपरिक पीसी मार्केटमध्ये मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे.

कॉम्प्युटर बाजारात सर्वेसर्वा असणाऱ्या मायक्रोसॉफ्टला स्मार्टफोन बाजारात जंग जंग पछाडले तरी काही पाय रोवता आले नव्हते. मायक्रोसॉफ्टची विंडोज ओएस फेल गेली. कंपनीने जगातील तेव्हाची सर्वात मोठी कंपनी नोकियाला देखील खरेदी करून पाहिले, परंतू काही केल्या स्मार्टफोनचा ऑपरेटिंग सिस्टीमचा बाजार मायक्रोसॉफ्टला जमला नाही. गुगलच्या अँड्रॉईडने आणि अॅपलच्या आयओएसने साधे पाऊलही ठेवू दिलेले नाही. अशातच आता मायक्रोसॉफ्टला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात टक्कर देण्यासाठी गुगलने कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. 

स्मार्टफोन आणि क्रोमबुकच्या बाजारपेठेत आपले वर्चस्व गाजवल्यानंतर आता गूगल पारंपरिक पीसी मार्केटमध्ये मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. गूगल लवकरच 'अ‍ॅल्युमिनियम OS' नावाचा एक नवा आणि महत्त्वाकांक्षी Android-आधारित ऑपरेटिंग सिस्टम लाँच करण्याची शक्यता आहे. जी खास लॅपटॉप आणि डेस्कटॉप कॉम्प्युटरसाठी डिझाइन केली जात आहे.

मायक्रोसॉफ्टच्या 'विंडोज' आणि ॲपलच्या 'मॅकओएस' या लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम्सला थेट आव्हान देण्यासाठी गूगलने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. हे नवे OS, Android च्या क्षमतेचा वापर पीसीसाठी करेल. ज्यामुळे डेस्कटॉपवर Android ॲप्स अधिक चांगल्या प्रकारे वापरता येणार आहेत. 

तसेच या अ‍ॅल्युमिनियम OS मध्ये गूगलच्या शक्तिशाली जेमिनी AI साधनांचे एकत्रीकरण असणार आहे. बॅटरी आणि मेमरी मर्यादांची अडचण येणार नसल्याने सध्या प्रीमियम Android फोन्समध्ये वापरले जाणारे AI फीचर्स PC प्लॅटफॉर्मवर अधिक वेगवान आणि शक्तिशाली बनणार आहेत. गूगलने अलीकडेच LinkedIn वर या प्रकल्पासाठी 'सीनियर प्रॉडक्ट मॅनेजर' पदासाठी भरती जाहीर केली होती. या जॉब लिस्टिंगमधूनच 'अ‍ॅल्युमिनियम OS' नावाच्या या नवीन, AI-केंद्रीत प्लॅटफॉर्मचे संकेत मिळाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Google challenges Microsoft: New OS for computers and laptops coming soon!

Web Summary : Google is developing 'Aluminum OS', an Android-based system for laptops and desktops, challenging Microsoft's Windows. It will integrate Gemini AI, offering faster, powerful AI features on PCs. Google seeks a Senior Product Manager for this project.
टॅग्स :googleगुगल