शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

मस्तच! WhatsApp चं हटके फीचर; कॉल चालू असताना वाचता येणार मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 15:48 IST

व्हॉट्सअ‍ॅपने आणखी एक भन्नाट फीचर आणलं आहे.

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपने आणखी एक भन्नाट फीचर आणलं आहे.कॉल वेटिंग हे नवं फीचर देण्यात आलं असून यामध्ये कॉलच्या दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करता येणार.आयओएस व्हर्जनसाठी हे खास फीचर रोलआऊट केले आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून व्हॉट्सअ‍ॅपही युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण व्हॉट्सअ‍ॅपने आणखी एक भन्नाट फीचर आणलं आहे. कॉल वेटिंग हे नवं फीचर देण्यात आलं असून यामध्ये कॉलच्या दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करता येणार आहे. कंपनीने आयओएस व्हर्जनसाठी हे खास फीचर रोलआऊट केले आहे. तसेच अपडेटमध्ये चॅट स्क्रीनही अधिक चांगली देण्यात आली आहे. 

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स ऑडिओ कॉल दरम्यान वेटिंग कॉल उचलू शकतात. कॉलिंगला महत्त्व देणाऱ्या युजर्ससाठी ही सुविधा फायदेशीर असणार आहे. या फीचरच्या मदतीने वेटिंग कॉल कट करण्याची तसेच सुरू असलेला कॉल थांबवून नवा कॉल रिसीव्ह करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं फीचर अँड्रॉईडमध्ये कधी येणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केलेलं नसल्यास ते अ‍ॅप स्टोरवर सर्च करून इन्स्टॉल करा. त्यानंतर या नव्या फीचरचा वापर करता येईल. युजर्सच्या सुरक्षिततेचा देखीस व्हॉट्सअ‍ॅपने विचार केला आहे. युजर्स सेटिंगमध्ये जाईन ग्रुपमध्ये कोणाला अ‍ॅड करायचं तसेच कोणाला अ‍ॅड करायचं नाही हे ठरवू शकतात. कंपनी अँड्रॉईड बीटावर डिलीट मेसेजसाठी एका नव्या ऑप्शनची चाचणी करत आहे. 

एकाच वेळी अनेक ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅप चालणार आहे म्हणजेच अनेक ठिकाणी लॉग इन करता येणार आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅप मल्टिपल डिव्हाईस सपोर्ट फीचरवर काम करत आहे. आयफोन युजर्ससाठी रजिस्ट्रेशन नोटिफिकेशन फीचर रोलआऊट केलं आहे. मल्टिपल डिव्हाईस सपोर्ट फीचरमध्ये युजर्सना अलर्ट मिळणार आहे. जर अन्य कोणी तुमच्या अकाऊंटमधून लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याबाबत एक अलर्ट युजर्सना मिळणार आहे. हे प्रायव्हसी फीचर सध्या केवळ iOS युजर्ससाठीच रोलआऊट करण्यात आले आहे. जर कोणी व्यक्ती अकाऊंट लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असेल तर व्हॉट्सअ‍ॅपवर अलर्ट येणार आहे. ज्यामध्ये 'तुमच्या फोन नंबरसाठी व्हॉट्सअ‍ॅप रजिस्ट्रेशन कोड रिक्वेस्ट आली आहे' असा मेसेज पाठवण्यात येणार आहे. 

चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, आता एकाच वेळी अनेक ठिकाणी WhatsApp चालणार 

WhatsApp वरही घेता येणार Netflix वरच्या व्हिडीओची मजा

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळीही व्हॉट्सअ‍ॅपने असंच एक फायदेशीर फीचर आणलं आहे. या फीचरचा सर्वाधिक फायदा हा Netflix युजर्सना होणार आहे. याआधी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक फीचर आलं होतं. यामध्ये YouTube चे व्हिडीओ हे व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये दिसत होते. Picture in Picture मोडच्या माध्यमातून YouTube व्हिडीओ हा एका फ्लोटिंग विंडोमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये प्ले होतो. अशाच पद्धतीने Netflix वरचे व्हिडीओ पाहता येणार आहेत.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडियाMobileमोबाइल