चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, आता एकाच वेळी अनेक ठिकाणी WhatsApp चालणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 03:19 PM2019-11-17T15:19:58+5:302019-11-17T15:38:50+5:30

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं.

whatsapp rolls out registraion notification feature | चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, आता एकाच वेळी अनेक ठिकाणी WhatsApp चालणार 

चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, आता एकाच वेळी अनेक ठिकाणी WhatsApp चालणार 

Next
ठळक मुद्देइन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं.व्हॉट्सअ‍ॅप मल्टिपल डिव्हाईस सपोर्ट फीचरवर काम करत आहे. नव्या फीचरमुळे एकाच वेळी एक अकाऊंट अनेक डिव्हाईसवर वापरता येणार आहे.

नवी दिल्ली - इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. एका ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅप लॉग इन असेल तर ते लॉग आऊट केल्याशिवाय दुसरीकडे लॉग इन करता येत नाही. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅप चालणार आहे म्हणजेच अनेक ठिकाणी लॉग इन करता येणार आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅप मल्टिपल डिव्हाईस सपोर्ट फीचरवर काम करत आहे. आयफोन युजर्ससाठी रजिस्ट्रेशन नोटिफिकेशन फीचर रोलआऊट केलं आहे. 

मल्टिपल डिव्हाईस सपोर्ट फीचरमध्ये युजर्सना अलर्ट मिळणार आहे. जर अन्य कोणी तुमच्या अकाऊंटमधून लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याबाबत एक अलर्ट युजर्सना मिळणार आहे. हे प्रायव्हसी फीचर सध्या केवळ iOS युजर्ससाठीच रोलआऊट करण्यात आले आहे. जर कोणी व्यक्ती अकाऊंट लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असेल तर व्हॉट्सअ‍ॅपवर अलर्ट येणार आहे. ज्यामध्ये 'तुमच्या फोन नंबरसाठी व्हॉट्सअ‍ॅप रजिस्ट्रेशन कोड रिक्वेस्ट आली आहे' असा मेसेज पाठवण्यात येणार आहे. 

नव्या फीचरमुळे एकाच वेळी एक अकाऊंट अनेक डिव्हाईसवर वापरता येणार आहे. सोशल मीडिया अकाऊंट्स अनेक ठिकाणी वापरता येतं. त्याप्रमाणेच हे फीचर असणार आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅप आपण एकाच वेळी एकाच अकाऊंटमधून केवळ मोबाईल आणि डेस्कटॉपवर वापरू शकतो. मात्र यासाठी प्रायमरी डिव्हाईसला सातत्याने इंटरनेट कनेक्ट करण्याची आवश्यक असते आणि त्यानंतर केवळ त्या डिव्हाईसचे मेसेज वेब व्हर्जनवर दिसतात. व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे 1.5 अब्ज युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर दररोज सहा कोटी मेसेज पाठवले जातात असा दावा कंपनीने केला आहे. 

whatsapp is banning groups with malicious names and all its members | ...म्हणून WhatsApp करतंय युजर्सना बॅन

WhatsApp वरही घेता येणार Netflix वरच्या व्हिडीओची मजा

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळीही व्हॉट्सअ‍ॅपने असंच एक फायदेशीर फीचर आणलं आहे. या फीचरचा सर्वाधिक फायदा हा Netflix युजर्सना होणार आहे. याआधी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक फीचर आलं होतं. यामध्ये YouTube चे व्हिडीओ हे व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये दिसत होते. Picture in Picture मोडच्या माध्यमातून YouTube व्हिडीओ हा एका फ्लोटिंग विंडोमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये प्ले होतो. अशाच पद्धतीने Netflix वरचे व्हिडीओ पाहता येणार आहेत.

Worth 5 crore gold theft by WhatsApp status followed | व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फॉलो करून पावणेचार कोटींचे सोने लांबविले

...म्हणून WhatsApp करतंय युजर्सना बॅन

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. यानंतर आता लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप गेल्या आठवड्यापासून संशयास्पद नावं असणाऱ्या ग्रुप्सना कायमचं बॅन करत आहे. संशयास्पद नाव किंवा एखादा हेतू बाळगून तयार केलेल्या ग्रुपवर व्हॉट्सअ‍ॅप कारवाई करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका युजरने कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचं नाव बदलून एका आक्षेपार्ह शब्दावरून दुसरं नाव ठेवलं होतं. त्यानंतर काही वेळातच व्हॉट्सअ‍ॅपकडून हा ग्रुप बॅन करण्यात आला.  तसेच व्हॉट्सअ‍ॅपने फक्त ग्रुप नाही तर ग्रुपमधील सर्व मेंबरना बॅन केले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता 100 ग्रुप मेंबर्सना बॅन केल्याची माहिती आणखी एका युजरने दिली आहे. 
 

Web Title: whatsapp rolls out registraion notification feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.