शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅपमध्ये लवकरच व्हॅकेशन मोड?; पर्सनल, ग्रुप चॅट आपोआप अर्काईव्ह होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 08:54 IST

अनावश्यक चॅट्सपासून ब्रेक घेता येणार; व्हॉट्स अ‍ॅपमध्ये लवकरच नवं फीचर

मुंबई: व्हॉट्स अ‍ॅपमध्ये बऱ्याच कालावधीपासून व्हॅकेशन मोडवर काम करत आहे. लवकरच हे फीचर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होऊ शकेल. सध्या व्हॉट्स अ‍ॅपच्या बिटा व्हर्जनमध्ये व्हॅकेशन मोड उपलब्ध आहे. वापरकर्त्यांना अनावश्यक चॅट्स, मेसेज आणि अपेड्टसपासून दिलासा देण्यासाठी व्हॅकेशन मोड फीचर आणलं जाणार आहे. जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंगव्हॅकेशन मोडचा वापर करून तुम्ही पर्सनल किंवा ग्रुप चॅट अर्काईव्ह करू शकता. सध्याच्या अर्काईव्ह मोडमध्ये आणि व्हॅकेशन मोडमध्ये थोडासा फरक आहे. नवीन ऍक्टिव्हिटी झाल्यानंतरही चॅट अर्काईव्ह करण्याची सुविधा व्हॅकेशन मोडमध्ये उपलब्ध आहे. सध्याच्या घडीला तुम्ही कोणतंही चॅट अर्काईव्ह केल्यास व्हॉट्स अ‍ॅप ते चॅट अगदी तळाला पाठवतं. मात्र त्या व्यक्तीकडून किंवा ग्रुपकडून नवा मेसेज आल्यास चॅट लगेच सर्वात वर पॉप अप होतं.भारीच! App ओपन न करता WhatsApp वर करता येतो झटपट मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं?२०१८ मध्ये सर्वप्रथम हे फीचर दिसलं होतं. व्हॉट्स अ‍ॅपच्या नोटिफिकेशन सेटिंग्समध्ये शो प्रिव्ह्यू ऑप्शनच्या खाली हा पर्याय उपलब्ध होता. मात्र आता हे फीचर नव्या अवतारात दिसणार आहे. आता व्हॅकेशन मोड स्वतंत्र सेक्शनमध्ये दिसेल. वापरकर्त्यानं व्हॅकेशन मोड सुरू केल्यावर अर्काईव्ह चॅट्स चॅट सेक्शनमध्ये सर्वात वर दिसू लागतील. वेगळ्या चॅटऐवजी सर्व अर्काईव्ह चॅट्स 'अर्काईव्हड चॅट्स' या एकाच सेक्शनमध्ये दिसतील. तुम्ही या टॅबवर क्लिक केल्यावर अर्काईव्हड चॅट्सचा नवा ऑप्शन उजव्या बाजूला सर्वात वर नोटिफिकेशन म्हणून दिसू लागेल. WhatsApp कॉलिंगमध्ये नवा बदल, ग्रुप कॉल आला की...वापरकर्त्यानं नोटिफिकेशन्सवर क्लिक केल्यावर तो बिहेव्हियर ऑफ अर्काईव्हड चॅट्सचा पर्याय निवडू शकतो. तिथे वापरकर्त्याला दोन पर्याय दिसतील. 'नोटिफाय न्यू मेसेजेस' किंवा 'ऑटो हाईड इनऍक्टिव्ह चॅट्स' यांच्यातील पर्याय निवडता येऊ शकेल. सध्याच्या घडीला हे दोनच पर्याय उपलब्ध असतील. पुढील काही दिवसांत त्यात आणखी काही पर्यायांची भर पडू शकते.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप