प्रतिक्षा संपली! WhatsApp चं डार्क मोड फीचर लाँच, असं करा अ‍ॅक्टिव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 10:52 AM2020-03-04T10:52:44+5:302020-03-04T10:58:47+5:30

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स खूप दिवसांपासून या फीचरची वाट पाहत होते. त्यानंतर डार्क मोड फीचर हे आयफोन आणि अँड्रॉयड या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. 

whatsapp dark mode finally arrives for android and ios users worldwide SSS | प्रतिक्षा संपली! WhatsApp चं डार्क मोड फीचर लाँच, असं करा अ‍ॅक्टिव्ह 

प्रतिक्षा संपली! WhatsApp चं डार्क मोड फीचर लाँच, असं करा अ‍ॅक्टिव्ह 

Next
ठळक मुद्देWhatsApp ने Dark Mode फीचर आणल्याने आता आणखी मजा येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे डार्क फीचर कमी प्रकाशात चांगली व्हिजिबिलिटी देते. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आपल्याला हवं तसा, हवं तेव्हा डार्क मोड फीचरचा वापर करू शकतात.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपच्या डार्क मोड फीचरची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर व्हॉट्सअ‍ॅपचं हे बहुप्रतिक्षेत फीचर लाँच करण्यात आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर आणत असतं. आपल्या युजर्ससाठी WhatsApp ने Dark Mode फीचर आणल्याने आता आणखी मजा येणार आहे. कंपनी Android Developers आणि Apple iOS Developers वर Dark Mode फीचरवर काम करत होती. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स खूप दिवसांपासून या फीचरची वाट पाहत होते. त्यानंतर डार्क मोड फीचर हे आयफोन आणि अँड्रॉयड या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपचे डार्क फीचर कमी प्रकाशात चांगली व्हिजिबिलिटी देते. त्यामुळे युजर्संच्या डोळ्यांवर फारसा परिणाम होत नाही. कमी प्रकाशात अथवा अंधारात यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणं आता सोपं होणार आहे. काही दिवसांपूर्वी डार्क मोड फीचरचे काही फोटो हे लीक झाले होते. मात्र हे फीचर युजर्सना कधी उपलब्ध होणार याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नव्हती. त्यानंतर आता हे फीचर लाँच करण्यात आले आहे. गुगल क्रोम (Google Chrome) आणि इतर काही गुगल अ‍ॅप्स (Google Apps) सोबत फेसबुक मेसेंजरने देखील आपल्या प्लॅटफॉर्मवर डार्क मोड फीचरचा समावेश केला आहे.  

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आपल्याला हवं तसा, हवं तेव्हा डार्क मोड फीचरचा वापर करू शकतात. त्यानुसार ऑन, ऑफ कधी करायचं हे ठरवा. डार्क मोडमध्ये बॅकग्राऊंडवर डार्क ग्रे टेक्स्ट दिसतो. अँड्रॉईड 10 आणि आयओएस 13 युजर्स सिस्टमच्या सेटिंगमध्ये जाऊन हे फीचर ऑन करू शकता. तसेच Android  फोनचा वापर करत असाल तर आधी तुमचा फोन  Android Q च्या बीटा व्हर्जनवर काम करत आहे का हे तपासून घ्या. अनेक Andorid Mobile फोन Android Q च्या लेटेस्ट बीटा व्हर्जनचा वापर करू शकतात. या लिस्टमध्ये गुगल पिक्सलच्या काही स्मार्टफोनचा समावेश आहे. 

Android फोनवर असं करा Dark Mode फीचर ऑन 

- सर्वप्रथम स्मार्टफोनच्या ‘Settings’ मध्ये जाऊन ‘Display’ ऑप्शनवर टॅप करा. 

- ‘Select Theme’ वर टॅप करून Dark ऑप्शनवर क्लिक करा.

- Settings मध्ये खाली देण्यात आलेल्या ‘Developers Options’ वर जा. 

- Settings मध्ये Developers Options टॅब येत नसेल तर Settings मध्येAbout phone असलेल्या Build number वर सात वेळा क्लिक कर अ‍ॅक्टिवेट करू शकता. त्यानंतर Settings मध्ये Developers Options चा समावेश होईल.

- WhatsApp Settings मध्ये जाऊन ‘Wallpaper’ ऑप्शनवर क्लिक करून ‘None’ वर क्लिक करा असं केल्यास व्हॉट्सअ‍ॅप डार्क मोडवर काम करेल. 


iOS वर असं करा Dark Mode फीचर ऑन 

- सर्वप्रथम  iPhone च्या ‘Settings’ वर जा. तिथे ‘General’ ऑप्शनवर क्लिक केल्यास ‘Accessibility’ वर क्लिक करा. 

- ‘Display Accommodations’ ऑप्शन दिसेल. त्यामध्ये ‘Invert Colours’ ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ‘Smart Invert’ ऑप्शनवर क्लिक करणे गरजेचे आहे. 

- असं केल्यास iPhone च्या सर्व अ‍ॅप्समध्ये Dark Theme अप्लाय होईल.

- त्यानंतर  Android प्रमाणे WhatsApp Settings मध्ये जाऊन ‘Wallpaper’ ऑप्शनवर क्लिक करून ‘None’ वर क्लिक करा असं केल्यास व्हॉट्सअ‍ॅप डार्क मोडवर काम करेल. 

crime will be register on WhatsApp Group Admin in case of koregaon bhima | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपअ‍ॅडमिनवर होणार गुन्हे दाखल

'या' बातम्या ही नक्की वाचा

लय भारी! सिंगल कॅमेरा फोनवरून Facebook वर अपलोड करता येणार 3D फोटो 

Google Chrome चा वापर करता?, मग त्वरित करा 'हे' काम, अन्यथा...

TikTok ने आणलं दमदार फीचर, मुलांच्या करामतींवर आता पालकांची नजर

'Meena' मारणार युजर्सशी मनसोक्त गप्पा, गुगलने आणली भन्नाट 'चॅटबोट'

आता स्मार्टफोन राहणार थंडा थंडा कूल कूल, शाओमीचा नवा पंखा पॉवरफूल

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : 'मोदींची नाट्यछटा, अफवांनी प्राण तळमळला!'; शिवसेनेचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

मध्य प्रदेशात राजकीय भूकंप? भाजपानं आठ आमदारांना ओलीस ठेवलं; काँग्रेसचा गंभीर आरोप

कोरोनामुळे देशासह राज्यातही यंत्रणा सतर्क

आधी मराठा, नंतर मुस्लिम समाजाला आरक्षण, मंत्र्यांमध्ये मात्र विसंवादी सूर कशासाठी?

गिरणी कामगारांच्या घरांचा भार सरकारी तिजोरीवर?

 

Read in English

Web Title: whatsapp dark mode finally arrives for android and ios users worldwide SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.