कोरोनामुळे देशासह राज्यातही यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 07:19 AM2020-03-04T07:19:58+5:302020-03-04T07:20:50+5:30

मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह सर्व शहरांमध्ये, जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, तिथेही दक्षता घेण्यात येत आहे.

Corona alerts the country and even the state | कोरोनामुळे देशासह राज्यातही यंत्रणा सतर्क

कोरोनामुळे देशासह राज्यातही यंत्रणा सतर्क

Next

मुंबई/पुणे/नाशिक/नवी दिल्ली : कोरोनाचे केरळमधील तीन रुग्ण बरे झाल्यानंतर देशात आणखी तीन रुग्ण आढळल्याने सरकारी यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह सर्व शहरांमध्ये, जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, तिथेही दक्षता घेण्यात येत आहे.
मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात व पुण्याच्या नायडू रुग्णालयात प्रत्येकी दोन जण निरीक्षणाखाली आहेत. नाशिकमधील तिघा संशयितांना मात्र कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया, इराण व इटली येथून आलेल्या ६५,६२१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.
इटलीमार्गे आलेल्या नोएडातील रहिवाशाला कोरोनाची लागण झाली आहे. तो, त्याचे कुटुंबीय व त्याच्या संपर्कातील व्यक्तींवर सफदरजंग हॉस्पिटलमधील विशेष कक्षात उपचार सुरू आहेत. तो ज्या हॉटेलात गेला होता, तेथील कर्मचाऱ्यांनाही रुग्णालयात नेले आहे. तेथील दोन शाळांना कोरोनाच्या भीतीने सुटी देण्यात आली आहे.
दिल्लीत २५ हॉस्पिटलमध्ये विशेष कक्ष स्थापन केले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी आठ हजार कीट व साडेतीन लाख मास्क दिले आहेत. परदेशांतून आलेल्या प्रत्येकास आयटीबीपीच्या शिबिरात ठेवण्यात येणार असून, त्यासाठी २५00 लोकांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
>मास्कच्या मागणीत वाढ
‘कोरोना’च्या भीतीमुळे नागपूरमध्ये ‘एन-९५’ या मास्कचाही वापर वाढला आहे. हॉस्पिटलमध्ये जाणे मास्क मागत असल्याचेही अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे सदस्य हरीश गणेशानी म्हणाले. नौदलाचा ४0 देशांसह होणारा सराव विशाखापट्टणमऐवजी अन्यत्र करण्याचा वा तूर्त रद्द करण्याचा विचार सुरू आहे. देशाच्या सर्व विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानांना मास्क, सॅनिटायझर, हातमोजे देण्यात येत आहेत. देशभरातील ६२ विमानतळांवर सीआयएसएफचे जवान तैनात असतात. इटलीहून हैदराबादला आलेल्या पर्यटकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच, दिल्लीतील २१ इटालियन व तीन भारतीयांना विलगीकरण शिबिरात हलविले आहे.

Web Title: Corona alerts the country and even the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.