WhatsApp : नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप (WhatsApp) सध्या सर्वात मोठे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपचे अनेक युजर्स आहेत. अशा परिस्थितीत युजर्सच्या सोयीसाठी कंपनी या प्लॅटफॉर्मवर नव-नवीन फीचर्स अॅड करत असते. व्हॉट्सअॅपवर आता चॅट थीम फीचर लाँच करण्यात आले आहे.
नवीन फीचरमुळे इन्स्टंट मेसेजिंग अॅप वापरण्याचा अनुभव बदलणार आहे. तुम्ही आता तुमचे चॅट बबल्स आणि वॉलपेपर आपल्या हिशोबाने सेट करू शकता. नवीन चॅट थीमसह तुम्ही वेगवेगळ्या लोकांच्या चॅटला एक नवीन थीम देऊ शकता. गर्लफ्रेंड असो, मित्र असो किंवा बॉस असो, प्रत्येकांच्या चॅटवर विविध थीम्स लागू केल्या जाऊ शकतात.
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही सर्व चॅट्समध्ये एकच थीम लावू शकता. व्हॉट्सअॅपच्या एक्स पोस्टमध्ये या नवीन फीचरचा उल्लेख करण्यात आला आहे. नवीन फीचर्ससह, तुम्ही तुमच्या चॅटच्या लूकवर अधिक कंट्रोल ठेवू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॅटचा कलर बदलू शकता आणि विविध थीम सेट करू शकता.
व्हॉट्सअॅपवर मिळतेय प्री-सेट थीमतुम्हाला व्हॉट्सअॅपवर प्री-सेट थीम मिळत आहेत. याद्वारे, तुम्ही तुमच्या चॅटच्या बॅकग्राउंड आणि बबल्स दोन्हींमध्ये आपल्या आवडीची थीम लागू करू शकता. याशिवाय, तुम्हाला कस्टमाइज्ड थीम इन्स्टॉल करण्याचा ऑप्शन देखील मिळतो. सर्व कलर वापरून तुम्ही तुमची स्वतःची एक वेगळी थीम देखील तयार करू शकता. एवढेच नाही तर व्हॉट्सअॅपने ३० नवीन वॉलपेपर देखील आणले आहेत. तुम्ही या इनबिल्ट-इन डिझाईनमधून देखील निवडू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या फोटो गॅलरीमधून बॅकग्राउंड अपलोड करू शकता.
व्हॉट्सअॅपमध्ये चॅट थीम कशी बदलायची?सर्व चॅट्सवर डीफॉल्ट थीम लागू करण्यासाठी सर्वात आधी व्हॉट्सअॅपवरील सेटिंग्ज ऑरप्शनवर जा. चॅट्स ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर डिफॉल्ट चॅट थीम ऑप्शनवर क्लिक करा. येथे तुम्ही तुमच्या आवडीची चॅट थीम निवडू शकता. तसेच, आता तुम्हाला विविध चॅट्सचा कलर बदलण्याचा ऑप्शन देखील दिसेल. iOS युजर्स स्क्रीनच्या वरच्या बाजूला दिसणाऱ्या चॅट ऑप्शनवर क्लिक करून थीम बदलू शकतात. जर तुम्ही अँड्रॉइड युजर्स असाल तर चॅट सेक्शनमधील तीन डॉटवर क्लिक करा. चॅट थीम ऑप्शनवर क्लिक करा आणि थीम बदला. विशेष म्हणजे, या थीम प्रायव्हेट आहेत. या फक्त तुम्हीच पाहू शकता. ज्या व्यक्तीच्या चॅटमध्ये तुम्ही थीम वापरत आहात, त्याला ते दिसणार नाही.