Whats App'ने लाँच केलं भन्नाट फिचर! आता सर्वांना तुमचा आवाज ऐकू येणार, असं सुरू करा फिचर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 01:28 PM2023-02-06T13:28:56+5:302023-02-06T13:29:14+5:30

सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप म्हणजेच व्हॉट्स अॅप. आता Whats App आपल्या रोजच्या कामाचा भाग झाले आहे. whats app नेहमी आपल्या वापरकर्त्यांना नवीन फिचर लाँच करत असते.

whatsapp brings voice recordings in status updates feature know how to use | Whats App'ने लाँच केलं भन्नाट फिचर! आता सर्वांना तुमचा आवाज ऐकू येणार, असं सुरू करा फिचर

Whats App'ने लाँच केलं भन्नाट फिचर! आता सर्वांना तुमचा आवाज ऐकू येणार, असं सुरू करा फिचर

googlenewsNext

सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप म्हणजेच व्हॉट्स अॅप. आता Whats App आपल्या रोजच्या कामाचा भाग झाले आहे. whats app नेहमी आपल्या वापरकर्त्यांना नवीन फिचर लाँच करत असते. Whatsapp मध्ये यूजर्सना अनेक फीचर्स मिळतात, ज्याच्या मदतीने चॅटिंग मजेदार बनते. यावर उपलब्ध स्टेटस अपडेट्स फीचर देखील करोडो यूजर्स रोज वापरतात, स्टेटर संदर्भात आता कंपनीने मोठी अपडेट दिली आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्ते आता स्टेटस म्हणून त्यांच्या स्वत:च्या आवाजात ३० सेकंदांपर्यंतचे व्हॉइस रेकॉर्डिंग शेअर करू शकतणार आहेत.

WhatsApp च्या नवीनतम बीटा व्हर्जनमध्ये एक नवीन फिचर समोर आले आहे, यामध्ये फोटो, व्हिडीओ आणि स्टेटस अपडेटमधील मजकूर व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना व्हॉइस नोट्स शेअर करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे. तिसरा मायक्रोफोन पर्याय देखील स्टेटस विभागात 'पेन्सिल' आणि 'कॅमेरा' चिन्हांसह असू शकतो. या बटणावर टॅप केल्यानंतर, ते रेकॉर्डिंग स्थितीत ठेवता येते.

हे फिचर लवकरच सर्वांसाठी आणले जाईल. मेसेजिंग अॅपच्या Android आवृत्ती 2.23.3.18 साठी बीटामध्ये, नवीन पर्याय स्टेटस अपडेट्स विभागात उपलब्ध आहे. बीटा चाचणी संपल्यानंतर, ते स्थिर अॅपचा भाग बनवले जाऊ शकते. 

असं वापरु नवं फिचर

नवीन फिचरसाठी अगोदर अॅप अपडेट करावे लागेल. जर तुम्ही बीटा व्हर्जन वापरकर्ता असाल तर अॅप उघडल्यानंतर तुम्हाला स्टेटसमध्ये जावे लागेल .

यात पुढ तुम्हाला  उजवीकडे, तुम्हाला कॅमेरा आणि त्याच्यावर पेन्सिल चिन्ह दिसेल. तुम्हाला फोटो किंवा व्हिडीओ शेअर करायचा असेल तर तुम्हाला कॅमेरा आयकॉनवर टॅप करावे लागेल.

यात व्हॉइस रेकॉर्डिंग किंवा मजकूर जोडण्यासाठी, तुम्हाला पेन्सिल चिन्हावर टॅप करावे लागेल. पुढे मजकूर टाईप करण्याशी संबंधित विंडो उघडेल, जिथे उजव्या बाजूला 'मायक्रोफोन' चिन्ह दिसेल.

हा आयकॉन धरल्यानंतर, तुम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग करू शकाल. 30 सेकंदांपेक्षा कमी रेकॉर्ड केल्यानंतर, तुम्हाला 'सेंड' बटणावर टॅप करावे लागेल आणि व्हॉइस रेकॉर्डिंग स्टेटस अपडेट म्हणून शेअर केले जाईल.

विशाल भारद्वाजच्या 'या' चित्रपटाची Apple च्या सीईओंना भुरळ, iPhone मधून शूट झाला सिनेमा; म्हणाले...

ज्या वापरकर्त्यांनी अॅप अपडेट केले आहे त्यांनाच नवे फिचर मिळणार आहे, अॅप अपडेट केले आहे त्यांनाच हे रेकॉर्डिंग स्टेटस दिसणार आहे. याशिवाय, वरच्या उजव्या बाजूला दिसणार्‍या 'कलर टूल' आयकॉनवर टॅप करून रेकॉर्डिंगच्या मागे दिसणारा रंग बदलता येतो.

Web Title: whatsapp brings voice recordings in status updates feature know how to use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.