Meta Threads नक्की आहे तरी काय? कसं वापराल? एका दिवसात केलाय कुणालाच न जमलेला विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 12:05 PM2023-07-07T12:05:34+5:302023-07-07T12:06:08+5:30

एलॉन मस्कच्या Twitter ला मार्क झुकरबर्गचं Instagram थ्रेड्स देणार जोरदार टक्कर

What is Meta Threads by Instagram how to use this App 50 Million users in single day huge historical record | Meta Threads नक्की आहे तरी काय? कसं वापराल? एका दिवसात केलाय कुणालाच न जमलेला विक्रम

Meta Threads नक्की आहे तरी काय? कसं वापराल? एका दिवसात केलाय कुणालाच न जमलेला विक्रम

googlenewsNext

Meta Threads Records: मेटा कंपनीचे लोकप्रिय फोटो-व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप इंस्टाग्राम यांनी ट्विटरला टक्कर देण्यासाठी म्हणून थ्रेड्स हे अ‍ॅप लाँच केले आहे. ट्विटरचे मालक एलॉन मस्क हे ट्विटरमध्ये सतत नवनवीन बदल करत असतात. असे असताना मेटा कंपनीने युजर्ससाठी एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. Meta Threads हे अ‍ॅप भारतात लाँच करण्यात आले आहे. मेटा प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे की त्यांच्या कंपनीचे नवीन अ‍ॅप थ्रेड्स ट्विटरला मागे टाकेल असा त्यांचा उद्देश आहे.

ट्विटरमधील या सततच्या बदलांमुळे वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्म वापरणे कठीण होत आहे. वापरकर्ते Twitterला एक चांगला पर्याय शोधत असताना, Instagram च्या नवीन Threads अ‍ॅपला त्याचा थेट फायदा होताना दिसत आहे. तज्ज्ञांचे मत आहे की जे मायक्रो ब्लॉगिंग ट्विटरवरील अलीकडील बदलांमुळे नाराज आहेत, त्यांना थ्रेड्स अ‍ॅप आकर्षित करू शकेल. ते खरे ठरल्याचे दिसले असून अवघ्या दोन तासांत 2 दशलक्षहून अधिक वापरकर्त्यांनी अ‍ॅपसाठी साइन अप केले.

थ्रेड्स वर काय सुविधा मिळणार?

युरोपीय संघराज्यातील (EU) देशांमध्ये अद्याप थ्रेड्स अ‍ॅप लाँच केलेले नाहीत. मात्र याचे फिचर्स ट्विटरसारखेच आहेत. वापरकर्ते थ्रेडवर 500 वर्णांपर्यंतचे (Characters) संदेश पोस्ट करू शकतात. थ्रेड्स हा इंस्टाग्रामचाच विस्तारीत प्लॅटफॉर्म आहे. यावर, युजर्स टेक्स्ट संदेशांव्यतिरिक्त लिंक्स, फोटो आणि 5 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ पोस्ट करू शकणार आहेत. पहिल्या चार तासांत या अ‍ॅपमध्ये 5 दशलक्ष युजर्स जोडले गेले. हे अ‍ॅप ‘युजर-फ्रेंडली’ ठेवल्याने याला जास्त यश मिळेल, असे झुकरबर्ग म्हणाले.

थ्रेड्स कसं वापराल?

तुम्ही थ्रेड्सवरून इंस्टाग्रामवर आणि इंस्टाग्रामवरून थ्रेड्सवर पोस्ट शेअर करू शकता. पहिल्या दिवशी काही युजर्सनी त्यावर फोटो पोस्ट करताना काही अडचणी येत असल्याचे सांगितले. पण युजरच्या वापरकर्त्यांच्या पोस्टचे फीड, ते ज्यांना फॉलो करतात त्यांचा मजकूर किंवा रेकमेंडेड मजकूर याच्यानुसार येतात, त्यालाच मेटा थ्रेड म्हणतात.

काय सुविधा मिळणार?

आपल्याला कोणी टॅग करावे, याचे नियंत्रण युजर्सच्या हाती असणार आहे. विशिष्ट शब्द असलेल्या पोस्टची उत्तरे फिल्टर करू शकता येणार आहेत. एखाद्याला अनफॉलो करणं, ब्लॉक करणं, प्रतिबंधित (Restrict) करणं किंवा तक्रार (Report) करणं या सुविधा थ्रेड्समध्ये देण्यात आल्या आहेत. Instagram वर ब्लॉक केलेला युजर आपोआप थ्रेड्स वर देखील ब्लॉग होईल.

मेटाने थ्रेड्स हे ट्विटरला प्रतिस्पर्धी अँप असल्याचे सांगितले. तर काही गुंतवणूकदारांनी थ्रेडला "ट्विटर किलर" देखील म्हटले आहे.

थ्रेड्सचा एका दिवसात जोरदार विक्रम

इंस्टाग्राम थ्रेड्सने एका दिवसात ५ कोटी युजर्सचा टप्पा ओलांडला. इतर अँप्सना ५ कोटींपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागला होता पाहा-

Netflix - 7 वर्षे, 5 महिने
ट्विटर - 9 महिने
फेसबुक - 2 वर्षे
इंस्टाग्राम - 19 महिने
ChatGPT - 1 महिना

EU मध्ये अद्याप थ्रेड्स का नाही?

थ्रेड्स आता १०० हून अधिक देशांमध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. यामध्ये ब्रिटनसारख्या देशांचा समावेश आहे परंतु काही नियामकांमुळे ते अद्याप युरोपियन युनियनमध्ये ते सुरू झालेले नाही.

थ्रेड्स ही फक्त सुरूवात- मेटा

फेसबुक आणि इंस्टाग्रामची मालकी असलेल्या मेटाने म्हटले आहे की थ्रेड्स ही सुरुवातीची आवृत्ती आहे. भविष्यात, मास्टोडॉन सारख्या इतर सोशल मीडिया अ‍ॅपसारखी वैशिष्ट्ये आणण्याची थ्रेड्सची योजना आहे, ज्यामध्ये लोकांशी थेट बोलण्याची क्षमता समाविष्ट आहे.

Web Title: What is Meta Threads by Instagram how to use this App 50 Million users in single day huge historical record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.