शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यात पडला तरी खराब होणार नाही! मोटोरोला, विवोसह सॅमसंगच्या वॉटरप्रूफ फोनचा बाजारात धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 15:09 IST

Best waterproof smartphones: तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे प्राधान्य दमदार बॅटरी, वॉटरप्रूफ कोटिंग आणि उत्तम कॅमेरा याला असेल, तर सध्या बाजारात अनेक भन्नाट पर्याय उपलब्ध आहेत.

तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे प्राधान्य दमदार बॅटरी, वॉटरप्रूफ कोटिंग आणि उत्तम कॅमेरा याला असेल, तर सध्या बाजारात अनेक भन्नाट पर्याय उपलब्ध आहेत.

मोटोरोला जी६७ पॉवर:मोटोरोलाचा हा फोन बॅटरीच्या बाबतीत अत्यंत शक्तिशाली आहे. या फोनची मूळ किंमत १६ हजार ९९९ रुपये असली तरी, १,५०० रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा फोन १५,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ८ जीबी रॅम आणि ६.७ इंचाचा डिस्प्ले आणि तब्बल ७००० mAh ची बॅटरी मिळते. शिवाय, या फोनमध्ये ग्राहकांना ५० एमपी मुख्य कॅमेरा आणि ३२ एमपी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन वॉटर आणि डस्टप्रूफ रेटिंगसह येतो.

विवो टी४एक्स:विवोचा हा फोन त्याच्या परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. या फोनची सुरुवातीची किंमत १६,९९९ रुपये इतकी आहे. ६.७२ इंचाचा डिस्प्ले आणि ६,५०० mAh बॅटरी मिळते. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० प्रोसेसरवर चालतो. यात ५० एमपी रिअर आणि ८ एमपी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन वॉटर आणि स्प्लॅशप्रूफ आहे.

रिअलमी पी४: वेगवान चार्जिंग हवं असेल तर रिअलमीचा हा एक उत्तम पर्याय आहे. या फोनची सुरुवाती किंमत १९ हजार २४९ रुपयांपासून सुरू होते. यात ७००० mAh ची महाकाय बॅटरी मिळते, जी ८०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात मीडियाटेक डायमेन्सिटी ७४०० अल्ट्रा प्रोसेसर आहे. यात ५० एमपी रिअर आणि १६ एमपी सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए३५ ५जी:सॅमसंगच्या ब्रँड व्हॅल्यूसह प्रिमियम डिस्प्ले शोधणाऱ्यांसाठी हा फोन खास आहे. या फोनची सुरुवातीची किंमत १९ हजार ६९९ रुपये आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ६.६ इंचाचा AMOLED डिस्प्ले, ५००० mAh बॅटरी मिळते. शिवाय, यात ५० एमपी ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात १३ एमपी सेल्फी कॅमेरा मिळतो.

रेडमी नोट १५: फोटोग्राफीची आवड असेल तर रेडमीचा हा फोन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो, याची सुरुवाती किंमत २२ हजार ९९८ रुपये इतकी आहे. ८ जीबी रॅम, ६.७७ इंचाचा AMOLED डिस्प्लेसह येणाऱ्या या फोनमध्ये ५५२० mAh बॅटरी मिळते. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाले तर, यात १०८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळतो. तर, २० मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन वॉटरप्रूफ आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Waterproof smartphones from Motorola, Vivo, Samsung create buzz in market.

Web Summary : Looking for a waterproof phone? Motorola, Vivo, Realme, Samsung, and Redmi offer great options with powerful batteries, excellent cameras, and water resistance. Prices start from ₹15,499.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनsamsungसॅमसंगMotorolaमोटोरोलाVivoविवो