शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
2
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
3
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
4
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
5
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
6
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
7
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
8
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
9
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
10
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
11
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
12
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
13
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
14
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
15
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
16
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
17
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
18
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
19
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
20
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?

सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:47 IST

WhatsApp : तुमच्या व्हॉट्स अ‍ॅपमधील पर्सनल मेसेज कोण वाचत तर नाही? हो सध्या एका अ‍ॅपवरुन तुमच्या व्हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचता येऊ शकतात.

WhatsApp :  तुमच्या व्हॉट्स अ‍ॅपचे पर्सनल चॅट दुसरेच कोण वाचू शकते. होय, सध्या एआयमुळे अनेक गोष्टी शक्य करता येतात. एआय जेवढे आपल्या फायद्याचे आहे तेवढेच ते तोट्याचेही ठरू शकते. गुगलचे एआय जेमिनीला अपग्रेड मिळाले आहे, यानंतर ते आता तुमच्या फोनचे मेसेज, कॉल आणि अगदी व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स देखील अ‍ॅक्सेस करू शकते. अलीकडेच अँड्रॉइड वापरकर्त्यांना गुगलकडून एक ईमेल मिळाला आहे. यामध्ये ७ जुलैपासून जेमिनीच्या अॅप्सशी संवाद साधण्याबाबत नवीन बदलांची माहिती देण्यात आली आहे.

इंटरनेटशिवाय करता येणरा चॅटिंग; जॅक डोर्सीने आणले नवीन ‘Bitchat’ App, पाहा फिचर्स...

जरी तुम्ही जेमिनी अ‍ॅपची अ‍ॅक्टिव्हिटी बंद केली असली तरीही ते तुमच्या फोनमधील काही प्रमुख अ‍ॅप्स जसे की फोन, मेसेजेस, व्हॉट्सअ‍ॅप आणि युटिलिटीजशी संवाद साधू शकेल, असं या ईमेलमध्ये म्हटले आहे. त्याचा उद्देश वापरकर्त्यांना एक चांगला आणि स्मार्ट अनुभव देणे आहे, असा दावा गुगलने केलाय. पण आपल्या गोपनीयतेला धोका असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

तुमचे चॅट, तुमची निवड की गुगलची?

जर तुम्ही जेमिनी वापरत असाल, तर तुमचे संभाषण तुमच्या खात्यात ७२ तासांसाठी सेव्ह केले जाऊ शकते, मग ते अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी चालू असो वा बंद, गुगलने असेही स्पष्ट केले. म्हणजेच, तुमची काही वैयक्तिक माहिती तात्पुरती क्लाउडमध्ये साठवली जाईल.

जेमिनीची ही क्षमता निश्चितच त्याला अधिक 'सपोर्टिव्ह' बनवते, कारण ते तुमचे व्हॉट्सअॅप मेसेज वाचू शकत नाही तर तुमच्या वतीने उत्तर देखील देऊ शकते. जरी हे एआय फीचर काही लोकांना सोयीस्कर वाटत असले तरी, अनेक वापरकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Gemini ची सेटींग अशी बदला

जर तुमच्या व्हॉट्स अ‍ॅप आणि अन्य अ‍ॅपमध्ये जेमिनीने प्रवेश करु नये असं वाटत असेल तर तुम्ही या स्टेप्स फॉलो करुन ते बंद करु शकता.

१. तुमच्या अँड्रॉइड फोनवर जेमिनी अ‍ॅप उघडा.

२. उजवीकडे असलेल्या तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.

३. जेमिनी अॅप अॅक्टिव्हिटी वर जा आणि ते टॉगल ऑफ करा.

४. याशिवाय, 'अ‍ॅप्स' विभागात जाऊन तुम्ही फोन, मेसेजेस आणि व्हॉट्सअ‍ॅप सारख्या अ‍ॅप्सची परवानगी रद्द करू शकता.

तुम्ही अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी थांबवल्यानंतरही तुमचे चॅट्स ७२ तासांपर्यंत गुगलमध्ये स्टोअर राहू शकतात. म्हणून जर तुम्हाला जेमिनीला अ‍ॅक्सेस द्यायचा नसेल, तर अ‍ॅप परवानग्या बदलणे देखील महत्त्वाचे आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान