TRAI: व्होडाफोन आयडियाची जिओ- एअरटेलला टक्कर? सलग दुसऱ्या महिन्यात ग्राहकसंख्येत मोठी वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 14:54 IST2026-04-25T14:50:19+5:302026-04-25T14:54:22+5:30

व्होडाफोन-आयडियाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. 'ट्राय'च्या ताज्या आकडेवारीनुसार, टेलिकॉम कंपनीने सलग दुसऱ्या महिन्यात आपली ग्राहकसंख्या वाढवण्यात यश मिळवले आहे.

Vi Big Comeback: Vodafone Idea Adds Over 1 Lakh New Users in March 2026 | TRAI: व्होडाफोन आयडियाची जिओ- एअरटेलला टक्कर? सलग दुसऱ्या महिन्यात ग्राहकसंख्येत मोठी वाढ!

TRAI: व्होडाफोन आयडियाची जिओ- एअरटेलला टक्कर? सलग दुसऱ्या महिन्यात ग्राहकसंख्येत मोठी वाढ!

भारतीय दूरसंचार क्षेत्रात वोडाफोन-आयडिया पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करताना दिसत आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, व्होडाफोन- आयडियाच्या नवीन ग्राहकांच्या संख्येत सलग दुसऱ्या महिन्यात मोठी वाढ नोंदवण्यात आली. हे सकारात्मक आकडे कंपनीच्या ग्राहक संख्येतील स्थैर्याचे आणि पुनरागमनाचे संकेत मानले जात आहेत.

ट्रायच्या मार्च २०२६ च्या अहवालानुसार, फेब्रुवारी महिन्यात कंपनीने २१ हजार ९२७ नवीन ग्राहक जोडले होते. मात्र, मार्च महिन्यात या आकड्याने मोठी झेप घेत १,०२,८९९ नवीन ग्राहकांची भर घातली आहे. विशेष म्हणजे, कंपनीला शहरांऐवजी ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत असून, मार्चमध्ये ग्रामीण भागातून तब्बल १,९२,२११ ग्राहक 'वी'शी जोडले गेले आहेत.

देशातील एकूण १५ सर्कल्समध्ये कंपनीने आपली ग्राहकसंख्या वाढवली आहे. यात गुजरात (१ लाख ०१ हजार ७४८), कर्नाटक (१ लाख ७०१), बिहार (५७ हजार ४५२) आणि उत्तर प्रदेशातील ४७ हजार ८६९ ग्राहकांचा समावेश आहे. याशिवाय आसाम, हरियाणा, पंजाब आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांतही ग्राहकांच्या संख्येत चांगली वाढ झाली. 

व्होडाफोन- आयडियाने आपल्या नेटवर्कमध्ये केलेली सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि ग्राहकांसाठी आणलेल्या विशेष ऑफर्स या वाढीसाठी कारणीभूत ठरल्या आहेत. नॉनस्टॉप हिरो आणि 'सुपर हिरो' यांसारख्या प्लानमुळे ग्राहक कंपनीकडे आकर्षित होत आहेत. कंपनीने वेगाने 5G सेवा सुरू करण्यास सुरुवात केली. नुकतीच ९० नवीन शहरांमध्ये 5G विस्ताराची घोषणा करण्यात आली असून, मे २०२६ पर्यंत देशातील एकूण १३३ शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांत १५ सर्कल्समध्ये सकारात्मक वाढ नोंदवून व्होडाफोन आयडियाने टेलिकॉम क्षेत्रात आपल्या स्पर्धकांना जोरदार टक्कर देण्यास सुरुवात केली आहे.

Web Title : वोडाफोन आइडिया की बढ़त: जियो, एयरटेल को टक्कर, ग्राहक संख्या में वृद्धि!

Web Summary : वोडाफोन आइडिया लगातार दूसरे महीने ग्राहक जोड़ रहा है, जिससे उसकी स्थिति मजबूत हो रही है। ग्रामीण क्षेत्रों से विकास हो रहा है। नेटवर्क निवेश और ग्राहक केंद्रित ऑफ़र महत्वपूर्ण कारक हैं। मई 2026 तक 133 शहरों में 5G विस्तार का लक्ष्य है।

Web Title : Vodafone Idea Gains Momentum: Subscriber Growth Challenges Jio, Airtel

Web Summary : Vodafone Idea is strengthening its position, adding subscribers for the second consecutive month. Rural areas are driving growth. Network investments and customer-centric offers are key factors. 5G expansion is underway, aiming for 133 cities by May 2026.