Thomson LED TV available for Rs 4,999 during Flipkart Republic Day sale: Check out other TV deals | धमाका ऑफर! 'या' कंपनीची LED TV अवघ्या 4,999 रुपयांना मिळणार

धमाका ऑफर! 'या' कंपनीची LED TV अवघ्या 4,999 रुपयांना मिळणार

फ्लिपकार्ट सेलदरम्यान LED TV लाइनअपमध्ये भारी सूट दिली जाणार आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहक कंपनीची LED TV ची 4,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकणार आहे. फ्लिपकार्ट रिपब्लिक जे सेलची सुरूवात 19 जानेवारीपासून होणार आहे. दरम्यान, फ्लिपकार्ट प्लस मेंबर्स आज म्हणजेच 18 जानेवारीला 8:00PM पासून डिल्सची अॅक्सेस करू शकणार आहेत. सेलमध्ये बेसिक एलईडी टीव्ही 4,999 रुपयांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. भारतात ही किंमत कोणत्याही थॉमसन टीव्हीपेक्षा सर्वात कमी असणार आहे.

थॉमसनद्वारे फ्लिपकार्ट सेलमध्ये 24 इंचाचा LED TV आतापर्यंत सर्वात कमी किंमती विकला जाणार आहे. सेलमध्ये ही टीव्ही 7,499 रुपयांऐवजी 4,999 रुपयांना मिळणार आहे. थॉमसन कंपनीच्या 24 इंचाच्या टीव्हीमध्ये 20W स्पीकरचे आऊटपुट मिळणार आहे. सोबतच कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, यामध्ये 60Hz रिफ्रेश रेटसोबत सॅमसंगचे पॅनल वापरता येणार आहे. ही टीव्ही माय वॉल इंटरफेसवर सुरु होते. तसेच, या सेलमध्ये टीव्ही खरेदीवर एक वर्षांची वॉरंटी सुद्धा मिळत आहे. 

याचबरोबर, सेलमध्ये थॉमसनच्या इतर टीव्ही मॉडेलवर डिस्काउंट देण्यात येणार आहे. 32-इंच HD टीव्ही 7,999 रुपयांऐवजी 6,999 रुपयांना ग्राहक खरेदी करू शकणार आहेत. तसेच, कंपनी UD9 सीरीजच्या चार मॉडेलवरही डिस्काऊंटचा फायदा ग्राहकांनी देणार आहे. तसेच, 43 इंच 4K UHD टीव्ही ग्राहक 20,999 रुपयांना खरेदी करू शकणार आहेत. याशिवाय, ग्राहक मोठी स्क्रीन असलेली टीव्ही पाहत असेल तर थॉमसनच्या 50 इंचाच्या टीव्ही मॉडेलला 19,499 रुपयांना खरेदी करू शकणार आहे. यामध्ये 30 टक्के सूट देण्यात आली आहे.   
 

Web Title: Thomson LED TV available for Rs 4,999 during Flipkart Republic Day sale: Check out other TV deals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.