Technology: Whatsapp अपडेट केलंत का? Insta, FB च्या तोडीचं आलंय भन्नाट फिचर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:11 IST2025-03-26T16:05:19+5:302025-03-26T16:11:31+5:30
Technology: सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता दरदिवशी नवनवीन फिचर पुरवले जातात, अशीच एक भर पडली आहे whatsapp च्या फिचरमध्ये, कोणती ती बघा...

Technology: Whatsapp अपडेट केलंत का? Insta, FB च्या तोडीचं आलंय भन्नाट फिचर!
सोशल मीडियाचे युजर्स दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढणे स्वाभाविक आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी व्हाट्सअपने नवीन फिचर आणले आहे, ते म्हणजे आपल्या व्हाट्सअप स्टेट्सला आता आपल्या आवडत्या गाण्याची जोड देता येणार आहे. तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना टॅग देखील करता येणार आहे. ते कसे करायचे ते जाणून घ्या.
स्टेटस अपडेट करण्याची पद्धत :
- सर्वप्रथम व्हाट्सअप अँप गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करा.
- त्यामुळे तुमच्या स्टेट्सला म्युझिक आयकॉन दिसू लागेल.
- फेसबुक तसेच इन्स्टाग्रामप्रमाणे व्हाट्सअपवर देखील आपल्या आवडीचा फोटो डकवून त्यावर गाणं सेट करता येणार आहे.
- तसेच उजव्या बाजूला कोपऱ्यात @ हे चिन्ह असेल त्यावर क्लिक केले असता आपल्या मित्र मैत्रिणींना त्यात टॅग करता येणार आहे.
- तसेच इन्स्टाग्रामवर ठेवलेली स्टोरी शेअर करून थेट व्हाट्सअप स्टेट्सला ठेवता येणार आहे.
व्हाट्स अप स्टेट्स हाईड करण्याची सोय :
- अनेकदा आपल्याला आपला आनंद शेअर करावासा वाटतो, पण सगळ्यांबरोबरच नाही, अशा वेळी अमुक एक लोकांना हाईड करण्याची सोय व्हाट्सअपने दिली आहे.
- यासाठी स्टेट्स ठेवण्याआधी स्टेट्स सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला ते कोणापासून हाईड ठेवायचे आहे आणि कोणाला दाखवायचे आहे त्यांच्या नावासमोर टिकमार्क करू शकता आणि इतरांना हाईड ठेवू शकता.
- ही सेटिंग दर वेळी स्टेट्स अपडेट करताना बदलता येते, त्यामुळे सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगाव्या वाटल्या नाहीत तरी हरकत नाही, तुम्ही तुमच्या मूड नुसार स्टेट्स ठेवण्यात आणि बघणाऱ्या लोकांमध्ये बदल करू शकता.
त्यामुळे केवळ व्हाट्सअप ग्रुपमध्ये अडकून न राहता आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर व्हाट्सअपच्या नव्या फिचरचा लाभ घ्या आणि आपला आनंद इतरांबरोबर शेअर करा.