हायस्पीड इंटरनेट! भारतात Starlink चे सब्सक्रिप्शन किती रुपयांना मिळेल? कंपनीने जाहीर केली किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 16:35 IST2025-12-08T16:35:00+5:302025-12-08T16:35:16+5:30
Starlink Internet Subscription plan: Starlink ने अखेर भारतासाठी आपल्या सॅटेलाइट इंटरनेट प्लानची अधिकृत घोषणा केली आहे.

हायस्पीड इंटरनेट! भारतात Starlink चे सब्सक्रिप्शन किती रुपयांना मिळेल? कंपनीने जाहीर केली किंमत
Starlink Internet Subscription plan: इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सची उपकंपनी Starlink ने अखेर भारतासाठी आपल्या सॅटेलाइट इंटरनेट प्लानची अधिकृत घोषणा केली आहे. या सेवेकडे देशातील दुर्गम भागांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीची नवी आशा म्हणून पाहिले जात आहे. स्टारलिंकने आपल्या रेसिडेन्शियल (घरगुती) ग्राहकांसाठी मासिक सब्सक्रिप्शन शुल्क, हार्डवेअर किटची किंमत आणि सेवा वैशिष्ट्यांची माहिती जाहीर केली आहे.
स्टारलिंक रेसिडेन्शियल प्लान
स्टारलिंक इंडिया वेबसाइटवर अपडेट झालेल्या माहितीनुसार :
मासिक सब्सक्रिप्शन शुल्क : 8,600 रुपये
हार्डवेअर किट (डिश, राउटर इ.) : 34,000 रुपये (एकदाच)
30 दिवसांचा फ्री ट्रायल
अनलिमिटेड डेटा
हे दर प्रीमियम श्रेणीमध्ये मोडतात, मात्र दुर्गम भागासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरू शकते. कंपनीने अद्याप बिझनेस किंवा कमर्शियल प्लानचे दर जाहीर केलेले नाहीत, मात्र आगामी महिन्यांत हे प्लान्स येऊ शकतात.
स्टारलिंक प्लानची प्रमुख वैशिष्ट्ये
अनलिमिटेड इंटरनेट डेटा
99.9% पेक्षा जास्त अपटाइम देण्याचा दावा
30 दिवस फ्री ट्रायल, सेवा न आवडल्यास फुल रिफंड
सोपे इंस्टॉलेशन
स्टारलिंकचे उपकरण पारंपरिक ब्रॉडबँड किंवा फायबर उपलब्ध नसलेल्या भागातदेखील हाय स्पीड इंटरनेट देऊ शकते. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम प्रदेशांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
भारतामध्ये विस्ताराची तयारी
ऑक्टोबरच्या अखेरीस स्पेसएक्सने लिंक्डइनवर बंगळुरू ऑफिससाठी चार पदांसाठी भरती सुरू केली होती. यामध्ये पेमेंट मॅनेजर, अकाउंटिंग मॅनेजर, सीनियर ट्रेजरी अॅनालिस्ट आणि टॅक्स मॅनेजरचा समावेश होता. ही भरती स्टारलिंकच्या आंतरराष्ट्रीय विस्तार धोरणाचा भाग असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
ग्राउंड स्टेशनची योजना
अहवालांनुसार, स्टारलिंक भारतातील अनेक शहरांमध्ये ग्राउंड स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे. या स्टेशनद्वारे सॅटेलाइट इंटरनेटची गुणवत्ता आणि स्थिरता वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.