शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

Reliance AGM 2019: रिलायन्स जिओची बंपर लॉटरी; 100 एमबीपीएस स्पीडसोबत मिऴणार मोफत 4K टीव्ही आणि बरेच काही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 12:58 PM

गिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज एजीएम 2019 मध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. जिओ लाँच केल्यानंतर रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजविली होती. यातून प्रतिस्पर्धी कंपन्या सावरत नाहीत तोच रिलायन्सने जिओ गिगाफायबरची बंपर लॉटरी फोडली आहे. यामुळे पुन्हा बाजारात खळबळ उडणार आहे. सुरूवातीला 1600 शहरांमध्ये सेवा सुरू करण्यात येणार आहे. 

जिओ गिगाफायाबरच्या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून सुरु होणार आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. तसेच फायबर अॅन्युअल वेलकम ऑफरअंतर्गत 4D/4K टीव्ही आणि त्याचसोबत 4K ची मजा लुटण्यासाठी सेट अप बॉक्स मोफत मिळणार आहे. गिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 

Jio Fiber चा डेटा प्लॅन 700 रुपयांपासून सुरू होणार आहे. याचा वेग 100 Mbps असेल. यामध्ये ग्राहकांना ब्रॉडबँड, Jio होम टीव्ही आणि Jio IoT सेवा मिळणार आहे. यासोबतच जिओ लँडलाईन सेवा मोफत देणार आहे. यामध्ये आयएसडी कॉलिंगचे दर हे इतर कंपन्यांपेक्षा दहा पटींनी कमी असणार आहेत. या टेरिफची माहिती 5 सप्टेंबरला जिओच्या वेबसाईटवर मिऴणार आहे. 

इंटरनेटचा वेग 1000Mbps ते 1 जीबीपीएस एवढा प्रचंड असणार आहे. यामध्ये डिजिटल टीव्हीसोबत क्लाऊड गेमिंगही करता येणार आहे. याशिवाय जिओने Postpaid Plus ही सेवाही लाँच केली आहे. यामध्ये फॅमिली प्लॅन्स, डाटा प्लॅन, आंतरराष्ट्रीय रोमिंग, फोन अपग्रेडस्, होम सोल्यूशन तुमच्या फोनमध्ये उपलब्ध असणार आहेत. याशिवाय जिओने आणखी एक जबरदस्त प्लॅन लाँच केला आहे. जिओ फायबर ग्राहकांनी जर जिओ फॉरेव्हर प्लॅन घेतल्यास त्यांना खूप काही मिळणार आहे. यामध्ये HD/4K टीव्ही आणि 4K सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे. 

रिलायन्स जिओच्या बंपर लॉटरीसोबत भरतीही; अभियंत्यांसाठी छप्परफाड संधी

महत्वाचे- 

  • Jio Fiber प्लॅन 700 ते 10 हजार
  • आयुष्यभर मोफत कॉलिंग
  • अमेरिका, कॅनडासाठी 500 रुपयांचे अनलिमिटेड प्लॅन

 

फर्स्ट डे फर्स्ट शो प्रीमियम Jio Fiber ग्राहक सिनेमे रिलीजच्या दिवशीच घरबसल्या पाहता येणार. जिओने या प्लॅनला फर्स्ट डे फर्स्ट शो असे नाव दिले आहे. ही सेवा 2020 पासून सुरू होणार आहे.  

टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्सMobileमोबाइलInternetइंटरनेटReliance Jioरिलायन्स जिओReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशन