Reliance Jio's Bumper Lottery; jio Fiber to offer free HD/4K TV with 100 Mbps speed and more | Reliance AGM 2019: रिलायन्स जिओची बंपर लॉटरी; 100 एमबीपीएस स्पीडसोबत मिऴणार मोफत 4K टीव्ही आणि बरेच काही
Reliance AGM 2019: रिलायन्स जिओची बंपर लॉटरी; 100 एमबीपीएस स्पीडसोबत मिऴणार मोफत 4K टीव्ही आणि बरेच काही

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज एजीएम 2019 मध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. जिओ लाँच केल्यानंतर रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजविली होती. यातून प्रतिस्पर्धी कंपन्या सावरत नाहीत तोच रिलायन्सने जिओ गिगाफायबरची बंपर लॉटरी फोडली आहे. यामुळे पुन्हा बाजारात खळबळ उडणार आहे. सुरूवातीला 1600 शहरांमध्ये सेवा सुरू करण्यात येणार आहे. 


जिओ गिगाफायाबरच्या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून सुरु होणार आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. तसेच फायबर अॅन्युअल वेलकम ऑफरअंतर्गत 4D/4K टीव्ही आणि त्याचसोबत 4K ची मजा लुटण्यासाठी सेट अप बॉक्स मोफत मिळणार आहे. गिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 


Jio Fiber चा डेटा प्लॅन 700 रुपयांपासून सुरू होणार आहे. याचा वेग 100 Mbps असेल. यामध्ये ग्राहकांना ब्रॉडबँड, Jio होम टीव्ही आणि Jio IoT सेवा मिळणार आहे. यासोबतच जिओ लँडलाईन सेवा मोफत देणार आहे. यामध्ये आयएसडी कॉलिंगचे दर हे इतर कंपन्यांपेक्षा दहा पटींनी कमी असणार आहेत. या टेरिफची माहिती 5 सप्टेंबरला जिओच्या वेबसाईटवर मिऴणार आहे. 


इंटरनेटचा वेग 1000Mbps ते 1 जीबीपीएस एवढा प्रचंड असणार आहे. यामध्ये डिजिटल टीव्हीसोबत क्लाऊड गेमिंगही करता येणार आहे. याशिवाय जिओने Postpaid Plus ही सेवाही लाँच केली आहे. यामध्ये फॅमिली प्लॅन्स, डाटा प्लॅन, आंतरराष्ट्रीय रोमिंग, फोन अपग्रेडस्, होम सोल्यूशन तुमच्या फोनमध्ये उपलब्ध असणार आहेत. याशिवाय जिओने आणखी एक जबरदस्त प्लॅन लाँच केला आहे. 
जिओ फायबर ग्राहकांनी जर जिओ फॉरेव्हर प्लॅन घेतल्यास त्यांना खूप काही मिळणार आहे. यामध्ये HD/4K टीव्ही आणि 4K सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे. 

रिलायन्स जिओच्या बंपर लॉटरीसोबत भरतीही; अभियंत्यांसाठी छप्परफाड संधी

महत्वाचे- 

  • Jio Fiber प्लॅन 700 ते 10 हजार
  • आयुष्यभर मोफत कॉलिंग
  • अमेरिका, कॅनडासाठी 500 रुपयांचे अनलिमिटेड प्लॅन

 

फर्स्ट डे फर्स्ट शो 
प्रीमियम Jio Fiber ग्राहक सिनेमे रिलीजच्या दिवशीच घरबसल्या पाहता येणार. जिओने या प्लॅनला फर्स्ट डे फर्स्ट शो असे नाव दिले आहे. ही सेवा 2020 पासून सुरू होणार आहे. 
 

English summary :
Reliance AGM: Company President Mukesh Ambani has made big announcements at Reliance Industries AGM 2019. Reliance's JIO Gigafiber service soon be started. Initially the service will be launched in 1600 cities. Jio Gigafiber plans to start from Rs 700. These plans are for up to Rs 10,000.


Web Title: Reliance Jio's Bumper Lottery; jio Fiber to offer free HD/4K TV with 100 Mbps speed and more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.