रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:20 IST2025-11-24T19:17:47+5:302025-11-24T19:20:25+5:30
Reliance Jio Network Issue: कॉल केल्यावर समोरच्याला बोललेले ऐकायला जात नाहीय, समोरचा बोललेले ऐकायला येत नाहीय, अशी अवस्था झालेली आहे. ३५० रुपयांचे रिचार्ज मारून देखील ग्राहकांना नीट सेवा मिळत नाहीय, यामुळे युजर वैतागले आहेत.

रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
- हेमंत बावकर
रिलायन्स जिओच्या नेटवर्क समस्येला गेल्या दोन महिन्यांपासून मोठे ग्रहण लागलेले आहे. कॉल केल्यावर समोरच्याला बोललेले ऐकायला जात नाहीय, समोरचा बोललेले ऐकायला येत नाहीय, अशी अवस्था झालेली आहे. ३५० रुपयांचे रिचार्ज मारून देखील ग्राहकांना नीट सेवा मिळत नाहीय, यामुळे युजर वैतागले आहेत.
अनेकदा फोन कनेक्ट करताना समस्या येत आहेत. अनेकदा तुम्हाला मिस्ड कॉलचे मेसेज येत आहेत. तुम्हाला ५जी रेंजचा लोगो तर दिसतोय परंतू तुम्ही इतरांसाठी नॉट रिचेबल असता. एखाद्या संकटाच्या वेळी किंवा महत्वाच्या कामाच्यावेळी जर असे झाले तर काय होणार, असा प्रश्न उभा राहत आहे.
अनेक ग्राहक जे बीएसएनएलवरून रिलायन्स जिओकडे पोर्ट झाले आहेत, ते बीएसएनएल परवडली असे म्हणत आहेत. एवढी वाईट अवस्था रिलायन्स जिओची झाली आहे. समोरच्याला एकाच कॉलमध्ये वारंवार 'ऐकायला आले नाही' असे सांगावे लागत आहे. कॉलिंगवेळी फोन मध्येच कट देखील होत आहे.
३५० रुपये देऊनही...
रिलायन्स हा सध्या मार्केट लीडर आहे. सुरुवातीला ११० रुपयांत अनलिमिटेड फोरजी देणाऱ्या जिओने आता ते रिचार्ज ५जी साठी ३५० रुपयांवर नेऊन ठेवले आहे. यामुळे एअरटेल, व्होडाफोन या कंपन्यांनी देखील आपली रिचार्ज याच किंमतीत नेऊन ठेवली आहेत. २५० चे रिचार्ज मारले तर ४जी ची रेंज येते, मग इंटरनेट २जी होऊन जाते, अशी अवस्था आहे. ५जी चे रिचार्ज मारावे म्हणून ही व्यवस्था असणार आहे. कारण जीपे, भीम अॅप देखील ओपन करायचे म्हटले की गोल गोल सर्कल फिरत राहते, अशी या नेटवर्कची अवस्था झाली आहे.