iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:22 IST2026-01-15T19:21:52+5:302026-01-15T19:22:46+5:30
आयफोन घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! १७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सेलमध्ये आयफोनच्या किमती ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी सेलचा धडाका लावला आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचा सेल १६-१७ जानेवारीला सुरू होत असतानाच, रिलायन्स डिजिटलने आपल्या डिजिटल इंडिया सेल द्वारे ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. १७ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या सेलमध्ये आयफोनच्या विविध मॉडेल्सवर १२,००० रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी मिळणार आहे.
आयफोन १५ आता पहिल्यांदाच ५०,००० रुपयांच्या खाली उपलब्ध होणार आहे. अनेक निवडक मॉडेल्सवर अतिरिक्त बँक डिस्काउंट आणि इन्स्टंट कॅशबॅकची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. बजेटचे टेन्शन असलेल्या ग्राहकांसाठी कमीत कमी २ हजार ८८८ पासून हप्ते सुरू होत आहेत.
केव्हापासून सुरू होणार खरेदी?
रिलायन्स डिजिटलचा हा सेल १७ जानेवारी पासून सुरू होईल आणि २६ जानेवारी पर्यंत चालेल. केवळ आयफोनच नाही, तर इतर गॅजेट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवरही या काळात मोठी सवलत मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर हीच सर्वोत्तम वेळ ठरू शकते.
रिलायन्स सेलमध्ये आयफोनची किंमत किती असेल?
आयफोन १५ (१२८ जीबी) किंमत: ४९ हजार ९९० पासून सुरू- २,८८८ रुपयांचा ईएमआय पर्याय
आयफोन १६ (१२८ जीबी) किंमत: ५७ हजार ९९० पासून सुरू- ३,४५४ रुपयांचा ईएमआय पर्याय
आयफोन १७ (२५६ जीबी) किंमत: ७८ हजार ९०० पासून सुरू- ३, ४५४ रुपयांच्या ईएमआय पर्याय