Realme P4 Lite: ६.७४ इंच डिस्प्ले, ६३०० mAh बॅटरी...तरीही इतका स्वस्त? रिअलमीचा तगडा स्मार्टफोन लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:00 IST2026-02-20T14:59:27+5:302026-02-20T15:00:39+5:30
Realme P4 Lite 4G launched in India: चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअलमीने त्यांचा नवा स्मार्टफोन रिअलमी पी४ लाइट भारतात लॉन्च केला आहे.

Realme P4 Lite: ६.७४ इंच डिस्प्ले, ६३०० mAh बॅटरी...तरीही इतका स्वस्त? रिअलमीचा तगडा स्मार्टफोन लॉन्च!
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअलमीने त्यांचा नवा स्मार्टफोन रिअलमी पी४ लाइट भारतात लॉन्च केला आहे. रिअलमीच्या पी४ मालिकेतील हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे, कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन चांगला पर्याय ठरू शकतो.
रिअलमी पी४ लाइट हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम/ ६४ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम/ १२८ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची सुरुवाती किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. तर, ४ जीबी रॅम/ १२८ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना १००० रुपयांचे बँक डिस्काउंट आणि १००० रुपयांचे कूपन डिस्काउंट मिळत आहे. हा स्मार्टफोन बीच गोल्ड, ऑब्सिडियन ब्लॅक आणि सी ब्लू अशा तीन रंगात उपलब्ध आहे हा फोन २४ फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.
या बजेट-फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ६.७४ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला, ज्याचा रिफ्रेश रेट ९०Hz आणि ५६३ nits पर्यंतचा पीक ब्राइटनेस आहे. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित Realme UI वर चालतो. या फोनमध्ये १३ मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा मिळतो. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात शक्तिशाली ६,३०० mAh बॅटरी आणि 15W USB Type-C वायर्ड चार्जिंग आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये WiFi, Bluetooth 5.2, GPS आणि 4G LTE यांचा समावेश आहे. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.