नवीन फोन घेताना विचार करा; 12 मिनिटांत 80 टक्के चार्ज होणारा दमदार स्मार्टफोन येतोय भारतात  

By सिद्धेश जाधव | Published: June 9, 2022 05:58 PM2022-06-09T17:58:53+5:302022-06-09T17:59:01+5:30

जागतिक बाजारात आलेला Realme GT Neo 3T लवकरच भारतीयांच्या भेटीला येत आहे.  

Realme gt neo 3t which charges to 80 percent in 12 mins soon to be launched in india   | नवीन फोन घेताना विचार करा; 12 मिनिटांत 80 टक्के चार्ज होणारा दमदार स्मार्टफोन येतोय भारतात  

नवीन फोन घेताना विचार करा; 12 मिनिटांत 80 टक्के चार्ज होणारा दमदार स्मार्टफोन येतोय भारतात  

Next

Realme GT Neo 3T स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी इंडोनेशियात सादर करण्यात आला होता. हा फोन फक्त 12 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होतो, असा दावा कंपनीनं केला आहे. जागतीक लाँचनंतर कंपनीचे भारतीय चाहते या स्मार्टफोनची आतुरतेने वाट बघत आहेत. आता 80W फास्ट चार्जिंग असलेला Realme GT Neo 3T भारतात येत असल्याची बातमी आली आहे.  

टिपस्टर मुकुल शर्मानं दिलेल्या माहितीनुसार, Realme GT Neo 3T चं सपोर्ट पेज रियलमी इंडियाच्या वेबसाईटवर लाईव्ह करण्यात आलं आहे. यावरुन लवकरच देशात हा लाँच केला जाऊ शकतो, असं समजतं. सपोर्ट पेजवरून फिंगरप्रिंट स्कॅनर, फ्रंट कॅमेरा, पावर अ‍ॅडॉप्टर, रियर कॅमेरा आणि यूएसबी केबल सारख्या विविध स्पेयर पार्ट्सची किंमत सांगण्यात आली आहे. तसेच इंडोनेशिया लाँचमुळे फोनच्या संपूर्ण स्पेक्सचा खुलासा झाला आहे. तिथे हा फोन 30 हजार रुपयांच्या आसपास लाँच झाला आहे.  

Realme GT Neo 3T चे स्पेसिफिकेशन्स  

Realme GT Neo 3T मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या चार्जिंग स्पीडमुळे फोन 0 ते 50 टक्के चार्ज होण्यासाठी 12 मिनिटं लागतात, असा दावा करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.62 इंचाचा E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,300 nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो.  

Realme GT Neo 3T फोन Android 12 OS बेस्ड Realme UI 3.0 वर चालतो. फोनमध्ये Snapdragon 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत एकूण 13GB म्हणजे 8GB RAM आणि 5GB व्हर्च्युअल RAM देण्यात आला आहे. फोनमध्ये 128GB मेमरी मिळते. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 64MP च्या मुख्य कॅमेऱ्यासह मिळतो. ज्यात 8MP चा अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा कॅमेरा मिळतो. 

Web Title: Realme gt neo 3t which charges to 80 percent in 12 mins soon to be launched in india  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.