शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

OPPO चा नवा फिटनेस बँड लाँच, युजर्सना मिळणार जबरदस्त फीचर; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 3:11 PM

OPPO News : कंपनीने Oppo Band Style फिटनेस ट्रॅकर आणला आहे.

नवी दिल्ली - ओप्पो कंपनीने भारतात Oppo F19 Pro+ आणि Oppo F19 Pro लाँच केले आहे. तसेच कंपनीने Oppo Band Style फिटनेस ट्रॅकर आणला आहे. यामध्ये 12 वर्कआउट मोड्स, ब्लड ऑक्सिजन सेन्सर आणि रियल टाइम हार्ट रेट मॉनिटरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Oppo Band Style ची किंमत भारतात 2999 रुपये ठेवली आहे. 8 मार्च ते 23 मार्च दरम्यान याला 2799 रुपयात खरेदी करता येऊ शकते. याची विक्री फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि ऑफलाइन स्टोर्सवरून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या बँडसाठी तुम्हाला अनेक स्ट्रॅप कलर्स मिळणार आहेत. 

Oppo Band Style चे स्पेसिफिकेशन्स

फिटनेस बँडमध्ये 2.5D कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन सोबत 1.1 इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. सोबत थ्री अ‍ॅक्सेस एक्सलेरोमीटर, ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर आणि एसपीओटू सेन्सर देण्यात आला आहे. या रिस्टबँडमध्ये युजर्संना ब्लड ऑक्सिजन, हार्ट रेट फीचर मिळणार आहे. यासोबत ओप्पोने यात डेली अ‍ॅक्टिविटी ट्रॅकर, गेट अप रिमाइंडर्स आणि ब्रिदिंग एक्सरसाइजसारखे फीचर्स दिले आहेत. वर्कआउट ट्रेनिंगसाठी यात वर्कआउट मोड्स देण्यात आले आहेत. यात एक खास फॅट बर्न मोड फीचर्स दिले आहे. हे 5 एटीएम रेसिस्टेंट आहे. 

फिटनेस फोकस्ड फीचर्स शिवाय या बँडमध्ये कॉल्स आणि मेसेज साठी अलर्ट्स दिले आहेत. तसेच स्मार्टफोन्स सोबत कनेक्ट झाल्यानतर म्यूझिक प्ले बॅकला कंट्रोल केले जाऊ शकतात. युजर्संला यासाठी 40 हून जास्त फेसेस मिळणार आहेत. या बँडच्या कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ V5.0 चे सपोर्ट दिले आहे. अँड्रॉयड 6.0 आणि त्यापेक्षा वरच्या डिव्हाइस सोबत कंपिटिबल आहे. या फिटनेस ट्रॅकरची बॅटरी 100 एमएएच क्षमतेची आहे. सिंगल चार्जमध्ये ही 12 दिवस चालते, असा कंपनीचा दावा आहे. चार्ज करण्यासाठी याला दीड तासाचा वेळ लागतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

फक्त 5 मिनिटांत तब्बल 300,000 जणांनी खरेदी केला "हा" स्मार्टफोन; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

शाओमीच्या फोनची ग्राहकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. चीनमध्ये शाओमीची सब ब्रँड कंपनी रेडमीने आपली रेडमी के 40 सीरीजला लाँच केलं आहे. सध्या या सीरीजला चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. पहिल्या सेलमध्ये फक्त 5 मिनिटांत तब्बल 300,000  स्मार्टफोनची विक्री झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. रेडमी के 40 सीरीजचे तीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहे. यामध्ये Redmi K40, Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ या स्मार्टफोनचा समावेश आहे. याआधी कंपनीने फक्त पाच मिनिटांत Xiaomi Mi 11 चे 3,50,000 फोन विकल्याचा दावा केला होता. 

Redmi K40, Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ तिन्ही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 11 वर आधारित MIUI 12 आहे. Redmi K40 मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी HD+ (1,080x2,400 pixels) E4 AMOLED डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. Redmi K40 मध्ये Qualcomm Snapdragon 870 चिपसेट आहे. तसेच 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये चार रियर कॅमेरे आहे. ज्यात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 40 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

टॅग्स :oppoओप्पोIndiaभारतtechnologyतंत्रज्ञान