फक्त 5 मिनिटांत तब्बल 300,000 जणांनी खरेदी केला "हा" स्मार्टफोन; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 03:28 PM2021-03-06T15:28:47+5:302021-03-06T15:28:56+5:30

Technology News : पहिल्या सेलमध्ये फक्त 5 मिनिटांत तब्बल 300,000  स्मार्टफोनची विक्री झाल्याचा दावा कंपनीने केला आहे

xiaomi claims it has sold 3 lak redmi k40 series in 5 minutes china | फक्त 5 मिनिटांत तब्बल 300,000 जणांनी खरेदी केला "हा" स्मार्टफोन; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

फक्त 5 मिनिटांत तब्बल 300,000 जणांनी खरेदी केला "हा" स्मार्टफोन; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Next

नवी दिल्ली - शाओमीच्या फोनची ग्राहकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. चीनमध्ये शाओमीची सब ब्रँड कंपनी रेडमीने आपली रेडमी के 40 सीरीजला लाँच केलं आहे. सध्या या सीरीजला चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. पहिल्या सेलमध्ये फक्त 5 मिनिटांत तब्बल 300,000  स्मार्टफोनची विक्री झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. रेडमी के 40 सीरीजचे तीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहे. यामध्ये Redmi K40, Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ या स्मार्टफोनचा समावेश आहे. याआधी कंपनीने फक्त पाच मिनिटांत Xiaomi Mi 11 चे 3,50,000 फोन विकल्याचा दावा केला होता. 

Redmi K40, Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ तिन्ही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 11 वर आधारित MIUI 12 आहे. Redmi K40 मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी HD+ (1,080x2,400 pixels) E4 AMOLED डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. Redmi K40 मध्ये Qualcomm Snapdragon 870 चिपसेट आहे. तसेच 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये चार रियर कॅमेरे आहे. ज्यात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 40 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ Qualcomm Snapdragon 888 ओक्टा कोर प्रोसेसरसह येतो. Redmi K40 Pro 8GB रॅम ऑप्शनसोबत येतो. Redmi K40 Pro+ 12GB पर्यंत रॅम ऑप्शनसोबत येतो. फोटोग्राफीसाठी K40 Pro+ फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी या दोन्ही फोनमध्ये 40 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. Redmi K40 Pro+ मध्ये प्रायमरी लेन्स 108 मेगापिक्सलची आहे. या दोन्ही फोनमध्ये 256 जीबी पर्यंत स्टोरेज आणि कनेक्टिविटीसाठी सर्व आवश्यक फीचर्स दिले आहेत. फोनमध्ये 4520 एमएएच क्षमतेची बॅटरी आणि 33 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

जबरदस्त! Motorolaने लाँच केले दमदार स्वस्त अन् मस्त स्मार्टफोन्स; जाणून घ्या Moto G30, Moto G10 चे स्पेसिफिकेशन्स

मोटोरोलाने मार्केटमध्ये आपले दोन नवीन दमदार स्मार्टफोन Moto G30 आणि Moto G10 लाँच केले आहेत. सुरुवातीला कंपनीने या दोन्ही फोनला युरोपमधील काही देशात लाँच केलं आहे. तसेच भारतात लवकरच हे फोन लाँच होण्याची शक्यता आहे. मोटो G30 ची किंमत 180 यूरो म्हणजेच जवळपास 15,900 रुपये आहे. तर मोटो G10 ची किंमत 150 यूरो म्हणजेच जवळपास 13,200 रुपये आहे. मोटो G30 फोनमध्ये 720x1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत 6.5 इंचाचा IPS LCD  दिला आहे. डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येतो. फोनचा डिस्प्ले नॉज डिझाइनचा आहे. यात 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. मोटो G10 या फोनमध्ये कंपनीने 60Hz च्या रिफ्रेश रेट 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनला 4 जीबी रॅम आणि 128  जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑप्शन दिला आहे. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढू शकते. 

Web Title: xiaomi claims it has sold 3 lak redmi k40 series in 5 minutes china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.