शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

OnePlus 9 Series चे जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच; पाहा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 3:29 PM

OnePlus 9 OnePlus 9 Pro OnePlus 9R OnePlus Watch Launched Price in India Specifications: व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये लाँच केले फोन

ठळक मुद्देव्हर्च्युअल इव्हेंटमध्ये कंपनीनं लाँच केले स्मार्टफोनOnePlus 9R हा स्मार्टफोन गेमर्ससाठी करण्यात आला आहे तयार

OnePlus नं आपल्या एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये OnePlus 9 Series चे स्मार्टफोन्स लाँच केले आगे. कंपनीनं या सीरिजमध्ये OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus 9R हे फोन बाजारात आणले आहेत. OnePlus 9 या स्मार्टफोनची सुरूवातीची किंमत 49,900 रूपये इतकी आहे. तर OnePlus 9 Pro ची सुरूवातीची किंमत 64,999 रूपये इतकी आहे. दोन्ही फोनमध्ये जवळपास 15 हजार रूपयांचं अंतर आहे. पाहूया किंमत आणि स्पेसिफिकेशन्समध्ये हे दोन स्मार्टफोन्स कसे एकमेकांपासून निराळे आहेत.OnePlus 9 Pro मध्ये मोठा डिस्प्लेOnePlus 9 मध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रिझॉल्युशन 2400*1080 पिक्सेल आहे. फोनचा डिस्प्ले हा 120Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटसह येतो. या स्मार्टफोनचं वजन 192 ग्राम इतकं आहे. तर OnePlus 9 Pro मध्ये कंपनीनं 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले दिला ाहे. याचं रिझॉल्युशन 3216*1400 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. या स्मार्टफोनचं वजन 197 ग्राम आहे.

रिअर कॅमेरा सेटअपमध्ये फरकOnePlus 9 या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. तर यातील मेन कॅमेरा हा 48 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेलचा मोनोक्रोम सेन्सर देणअयात आला आहे. OnePlus 9 Pro मध्ये मागील बाजूला 4 कॅमेरे आहेत. या स्मार्टफोनचादेखील मेन कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय यात 50 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 8 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स आणि 2 मेगापिक्सेलची मोनोक्रोम लेन्स देण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. 

बॅटरी आणि वायरलेस चार्जिगदोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. OnePlus 9 मध्ये 65W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तर OnePlus 9 Pro मध्ये 65W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. OnePlus 9 हा स्मार्टफोन वॉटरप्रुफ नाही. तर OnePlus 9 Pro हा स्मार्टफोन IP68 रेटिंगसह येतो.

किती आहे किंमत?OnePlus 9 ची सुरूवातीची किंमत 49,999 रूपये इतकी आहे. ही किंमत 8 जीबी रॅम आणि 128 जीबी वाल्या स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 54,999 रूपये आहे. OnePlus 9 Pro च्या सुरुवातीच्या म्हणजेच ८ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 644,999 रूपये इतकी आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 69,999 रूपये आहे.  OnePlus 9R हा स्मार्टफोन गेमर्ससाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये OLED पॅनल देण्यात आलं असून त्याचा रिफ्रेश रेट 120 Hz इतका आहे. यामध्ये Snapdragon 870 हा प्रोसेसर देण्यात आला असून तो 8/128जीबी आणि 12/256 जीबी रॅमसह येतो. 

कॅमेरा आणि नासाचा काय संबंध ?कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार OnePlus 9 सीरिजच्या स्मार्टफोन्समध्ये 140 डिग्रीच्या फ्लिल्ड ऑफ व्ह्यूसोबत पॅनोरमिक कॅमेरा, तसंत फ्रन्ट फेसिंग कॅमेऱ्यात तेजीनं फोकस करण्यासाठी T-Lens टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय या स्मार्टफोन्समध्ये अल्ट्रा वाईड फोटोंसाठी विशेष लेन्स देण्यात आली आहे. व्हिडीओबद्दल सांगायचं झालं तर Hasselblad कॅमेरा उत्तम HDR व्हिडीओ रेकॉर्डिंग 120FPS वर 4K आणि 30FPS वर 8K व्हिडीओ रकॉर्डिंग सपोर्ट करेल. 

याशिवाय फोनमध्ये नवा Hasselblad Pro Mode देखील असेल. यामुळे युझर्सना नवा इंटरफेस आणि कॅमेऱ्यावर अधिक कंट्रोल मिळेल. दरम्यान, OnePlus चा प्रायमरी कॅमरा Sony IMX789 सेन्सर असेल. हा पहिल्यापेक्षा 64 टक्के अधिक कलरफुल असेल असा दावा कंपनीनं केला आहे. या शिवाय फोटोमध्ये अधिक डायनॅमिक आणि वायब्रंट कलर्स पाहायला मिळतील.चंद्रावर मानवाने पहिले पाऊल ठेवण्याच्या घटनेला 20 जुलैला 50 वर्षे पूर्ण झाली. त्याआधी म्हणजेच 18 जुलै 1969 ला नासाच्या यानाने चंद्राकडे झेप घेतली होती. या ऐतिहासिक घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे या सुवर्ण महोत्सवी वर्षाला नासाने रोमांचकारी असे 400 फोटो प्रसिद्ध केले होते. चंद्रावर पहिले पाऊल कोणी ठेवले? नील आर्मस्ट्राँगने. पण या नील आर्मस्ट्राँगसोबत आणखी दोघेजण या मोहिमेवर होते. आर्मस्ट्राँग यांनी पहिले पाऊल ठेवले, पण दुसरे पाऊल कोणी ठेवले याबाबत माहिती नसेल. या व्यक्तीचे नाव होते एल्ड्रिन. चंद्रावर पाऊल ठेवतानाचा फोटो आर्मस्ट्राँगॉचा नाही तर एल्ड्रिन यांचा आहे. कारण तेव्हा आर्मस्ट्रॉन्गच कॅमेरा हाताळत होते. पन्नास वर्षांपूर्वी कोणता कॅमेरा होता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर तेव्हाच्या उच्च दर्जाच्या Hasselblad कॅमेरामधून हे फोटो काढण्यात आले आहेत. हे कॅमेरे स्वीडनमध्ये बनविले जातात. एल्ड्रिन यांच्या पावलाचे ठसे आजही चंद्रावर आहेत. कारण तेथे वायूमंडळ नाही तसेच पाऊसही पडत नाही.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलonlineऑनलाइनSmartphoneस्मार्टफोनNASAनासा