शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

अरे व्वा...आता स्मार्टफोनमध्येच इनबिल्ट प्रोजेक्टर !

By शेखर पाटील | Published: January 12, 2018 4:07 PM

स्मार्टफोनमध्ये प्रोजेक्टर असल्यास किती मज्जा येईल असा विचार आपण करत असाल, तर आता मोव्हीफोन या मॉडेलमध्ये याच प्रकारचे इनबिल्ट प्रोजेक्टर देण्यात आले आहे.

स्मार्टफोनमध्ये प्रोजेक्टर असल्यास किती मज्जा येईल असा विचार आपण करत असाल, तर आता मोव्हीफोन या मॉडेलमध्ये याच प्रकारचे इनबिल्ट प्रोजेक्टर देण्यात आले आहे.

मोव्ही कंपनीने दोन वर्षांपूर्वीच स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट प्रोजेक्टर देण्याचे घोषीत केले होते. या मॉडेलची तेव्हा प्राथमिक माहितीदेखील देण्यात आली होती. तथापि, आता हा प्रोजेक्टरयुक्त स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यात येणार असून याचे लास व्हेगास शहरात सुरू असलेल्या सीईएस-२०१८ या प्रदर्शनीत अनावरण करण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या वरील बाजूस पिको कंपनीचे प्रोजेक्टर देण्यात आले आहे. याच्या मदतीने एचडी म्हणजेच ७२० पिक्सल्स क्षमतेच्या प्रतिमा आणि चलचित्र प्रक्षेपित करून २०० इंच आकारमानाच्या स्क्रीनवर पाहता येतात. विशेष बाब म्हणजे स्मार्टफोन कसाही फिरवला तरी पडद्यावर उमटणार्‍या प्रतिमा वा व्हिडीओ या आपोआप अ‍ॅडजस्ट होतात. खरं तर अलीकडच्या काळात अत्यंत आटोपशीर आकाराचे प्रोजेक्टर बाजारात उपलब्ध आहेत. मात्र एखाद्या स्मार्टफोनमध्येच अशा प्रकारची सुविधा असल्यास पोर्टेबल प्रोजेक्टरची गरजदेखील उरणार नाही. तात्काळ एखादे प्रेझेंटेशन दाखविण्यासह शैक्षणिक वा मनोरंजनपर बाबींसाठी याचा वापर होऊ शकतो. यामुळे अर्थातच हे मोव्हीफोनमधील सर्वात लक्षणीय फिचर मानले जात आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, यात ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात मीडियाटेक एमटी६७५० प्रोसेसर असून ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज असे दोन पर्याय असतील. हे स्टोअरेज १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. या स्मार्टफोनमध्ये १३ व ८ मेगापिक्सल्सचे मुख्य व फ्रंट कॅमेरे आहेत. तर यातील ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर चार तासांपर्यंत प्रोजेक्टर चालवता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. अर्थात फुल बॅटरी असल्यास एखादा चित्रपट पाहणे सहजशक्य आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. याचे मूल्य ५९९ डॉलर्स (सुमारे ३८ हजार रूपये) इतके असून ते लवकरच बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मोव्ही कंपनीने दिली आहे.