शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

2017मध्ये भारतात हे आहे गुगलवर टॉप ट्रेंडींग आणि मोस्ट सर्च ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 17:47 IST

२०१७ या वर्षात भारतात गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च केलं गेलं आणि सगळ्यात जास्त काय ट्रेडींग होतं याची यादी गुगलने जाहीर केलं आहे.

ठळक मुद्देखरंतर २०१७ हे वर्ष खऱ्या अर्थानं क्रांती करणारं वर्ष ठरलंय. यावर्षात सगळ्यात जास्त ट्रेंडिंग काय होतं माहितेय?या वर्षभरात कोणते विषय जास्त ट्रेंडिंग होते? कोणते प्रश्न गुगलला विचारण्यात आले? गुगलनं याची यादी जाहीर आहे.वर्षभरात अनेकदा भारतीयांनी नविन गोष्टींची माहिती घेण्यासाठी साहजिकच नेटिझन्सनं गुगलची मदत घेतली. 

नवी दिल्ली : खरंतर २०१७ हे वर्ष खऱ्या अर्थानं क्रांती करणारं वर्ष ठरलंय. यावर्षात सगळ्यात जास्त ट्रेंडिंग काय होतं माहितेय? सामाजिक, राजकीय, आर्थिक, मनोरंजन क्षेत्रात यावर्षात बरेच बदल झाले. या सगळ्यांची माहिती घेण्यासाठी साहजिकच नेटिझन्सनं गुगलची मदत घेतली. गुगलने २०१७ या वर्षात भारतात सर्वाधिक कोणती गोष्ट सर्च झाली याची यादीच जाहीर केलीय. यामध्ये बिटकॉईनपासून ते बाहुबली २ पर्यंत साऱ्या गोष्टींचा समावेश आहे. 

गुगलने नुकतीच एक यादी जाहीर केली. यामध्ये या वर्षभरात कोणत्या विषय जास्त ट्रेंडिंग होते? कोणते प्रश्न गुगलला विचारण्यात आले? गुगलनं याची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सगळ्यात ट्रेंडिंग ठरला आहे तो बाहुबली २ हा चित्रपट. तर, बिटकॉईन कसं खरेदी करावं इथपासून ते स्क्रीन शॉट कसा काढावा हे प्रश्न गुगलला जास्तप्रमाणात विचारले गेल्याचे गुगलने सांगितले आहे.  टॉप ट्रेंडिंग क्वेरिजमध्ये बाहुबली २, इंडियन प्रिमिअम लिग, लाईव्ह क्रिकेट स्कोअर, दंगल चित्रपट असे विषय होते. यावरून भारतीय  लोक कशाप्रकारे खेळ आणि मनोरंजन क्षेत्राला आपल्या आयुष्यात महत्त्व देतात हे स्पष्ट होतंय. तसंच, अनेक चित्रपटही ट्रेडिंगमध्ये होते. 

आधार कार्ड प्रत्येक कागदपत्रांना लिंक करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच,  आधार कार्ड पॅन कार्डलाही जोडण्याचंही आवाहन करण्यात आलंय.  म्हणूनच नेटिझन्सनेही आधार कार्ड पॅन कार्डला कसं लिंक करावं हे सर्च करण्यात आलंय. तसंच, जिओ फोन कसा बुक करावा, बिटकॉईन भारतात कसं खरेदी करावं, स्क्रीनशॉट कसा काढावा, होळीत चेहऱ्याला लागलेला रंग कसा काढावा असेही प्रश्न गुगलवर विचारण्यात आले आहेत. एव्हढेच नव्हे तर बिग बॉस ११ साठी मतदान कसं करावं असा प्रश्नही गुगलला विचारण्यात आला. जीएसटी म्हणजे काय?, बिटकॉईन काय आहे? जलिकट्टू काय आहे? हे प्रश्नही गुगलवर ट्रेंडिंग होते. तसंच, आपीएल, आयीसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी, सीबीएसई रिझल्ट, युपी निवडणूक निकाल, जीएसटी या बातम्यांनीही ट्रेंडिंग लिस्टमध्ये मानाचं स्थान पटकावलं आहे. 

तंत्रज्ञानविषयक बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

टॉप ट्रेंडिंग Queries

बाहुबली २

इंडिअन प्रिमिअर लिग

लाईव्ह क्रिकेट स्कोअर

दंगल

हाल्फ गर्लफ्रेंड

बद्रीनाथ की दुल्हनिया

मुन्ना मिशेल

जग्गा जासूस

चॅम्पिअन्स ट्रॉफी

रईस

आणखी वाचा - डीटीएच व केबलवरूनही पाहता येणार नेटफ्लिक्स !

टॉप ट्रेंडिंग 'HOW TO' 

आधार कार्ड पॅन कार्डला कसं जोडावं?

जिओ फोन कसा बुक करावा?

बिटकॉईन भारतात कसा विकत घ्यावा?

स्क्रिन शॉट कसे काढावे?

होळीचा रंग चेहऱ्यावर कसा काढावा?

जीएसटी रिर्टन कशी फाईल करावी?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी?

बीग बॉस ११ मध्ये कसं मतदान करावं?

भारतात इटिरम कसं विकत घ्यावं?

आणखी वाचा - फेसबुक मॅसेंजरची मुसंडी, युजर्संची संख्या झाली 170 कोटी

टॉप ट्रेंडिंग 'WHAT IS' 

जीएसटी काय आहे?

बिटकॉईन काय आहे?

जलिकट्टू काय आहे?

बीएस३ गाडी काय आहे ?

पेटा म्हणजे काय?

जिओ प्राईम म्हणजे काय?

कॅसिनी म्हणजे काय?

फिजेट स्पिनर म्हणजे काय?

लुनार ग्रहण म्हणजे काय ?

रॅन्समवेअर म्हणजे काय ? 

आणखी वाचा - गुगल असिस्टंटची वाढली व्याप्ती; आता टॅबलेट व जुन्या स्मार्टफोनवरही वापरता येणार

टॅग्स :googleगुगलIndiaभारतSocial Mediaसोशल मीडियाBitcoinबिटकॉइन