mitron users gets maharashtra cyber cell advisory to delete it now | Mitron युजर्ससाठी अलर्ट! त्वरित डिलीट करा अ‍ॅप नाहीतर...

Mitron युजर्ससाठी अलर्ट! त्वरित डिलीट करा अ‍ॅप नाहीतर...

नवी दिल्ली - शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकला Mitron हे अ‍ॅप जोरदार टक्कर देत आहे. आतापर्यंत हे तब्बल 50 लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.  मात्र आता Mitron युजर्सना एक अलर्ट देण्यात आला आहे. हे अ‍ॅप असल्यास ते त्वरित डिलीट करा असं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र सायबर सेलने टिकटॉप्रमाणे काम करणाऱ्या Mitron अ‍ॅप युजर्ससाठी एक अधिसूचना जारी केली आहे. अ‍ॅपमध्ये सुरक्षेवरून अनेक कमतरता आहेत. त्या युजर्सना नुकसान पोहोचू शकतात. तसेच हॅकर्स अकाऊंट हॅक करुन त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. अकाऊंटवरून धमकी सुद्धा दिली जाऊ शकते असं यामध्ये म्हटलं आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. ज्या व्यक्तींनी हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केले असेल त्यांनी त्वरित हे अ‍ॅप डिलीट करावे असे आवाहन केले आहे. गुगल प्ले स्टोरवरूनही Mitron अ‍ॅप हटवले आहे. सायबर सेलच्या माहितीनुसार, मित्रों अ‍ॅपवर कोणत्याही अकाऊंटमधून लॉगिन केल्यानंतर केवळ यूजर आयडीची माहिती झाली पाहिजे. यासाठी पासवर्डची गरज पडत नाही. खरं म्हणजे अ‍ॅपमध्ये Login with Google चे फीचर देण्यात आले आहे. हे अ‍ॅप गुगल अकाउंटवरून खासगी माहिती मिळवते तसेच ऑथेंटिकेशनसाठी कोणत्याही सिक्रेट टोकनला क्रिएट करत नाही.

Mitron अ‍ॅपमध्ये लॉगिनसाठी सिक्योर सॉकेट लेयल (SSL) प्रोटोकॉल फॉलो केला गेलेला नाही. याचाच फायदा हॅकर्स घेऊ शकतात. ते केवळ लॉगिन आयडी वरून अकाऊंट सहज हॅक करू शकतात. म्हणजेच हॅकर्स तुमचे अकाऊंटवरून कोणालाही मेसेज करू शकतात किंवा कमेंट करू शकतात. तसेच रिपोर्टच्या माहितीनुसार, हे एक पाकिस्तानी अ‍ॅप Tic Tic चे रिपॅकेज्ड व्हर्जन आहे. याशिवाय अ‍ॅपची मालकी नेमकी कुणाकडे आहे, याची माहिती समोर आली नाही. याची कोणतीही प्रायव्हसी पॉलिसी सुद्धा नाही. त्यामुळे सायबर सेलने या अ‍ॅपला तात्काळ डिलीट करण्यास सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Mitron अ‍ॅपमध्ये टिकटॉकपेक्षा फार वेगळे फीचर्स दिले नाहीत. मात्र हे आपल्या नावाने आणि ब्रँडिंगमुळे अल्पावधीत लोकप्रिय झाले आहे. अ‍ॅप आता नवीन आहे. यात अनेक बग्स आहेत. असे असले तरी याला पॉझिटिव्ह रिव्ह्यू आणि रेटिंग्स मिळाली आहे. जवळपास 4.7 रेटिंग्स मिळणाऱ्या अ‍ॅपमध्ये बरेच बग्स असल्याचे युजर्संनी सांगितले. लॉग इन करण्यातही काहींना अडचणी येत असल्याचे म्हटले आहे. मात्र इंडियन प्लॅटफॉर्म असल्याने लोकांची याला अधिक पसंती मिळत आहे. अ‍ॅपमध्ये टिकटॉक सारखे एडिटिंग फीचर्स सुद्धा नाहीत. फक्त 8.03 एमबी साईज असलेलं हे अ‍ॅप 11 एप्रिल 2020 रोजी रिलीज करण्यात आले आहे आणि 24 मे रोजी अपडेट मिळाले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'या' राज्याचा रेकॉर्ड; तब्बल 4.85 कोटी लोकांचं केलं स्क्रिनिंग

CoronaVirus News : ...अन् संरक्षणासाठी न्यायालयात गेलेल्या नवविवाहीत जोडप्याला ठोठावला 10 हजारांचा दंड

Cyclone Nisarga : अरविंद केजरीवालांनी केलं उद्धव ठाकरेंसाठी ट्विट; म्हणाले...

CoronaVirus News : देशातील रुग्णांची संख्या 2 लाखांवर; कोरोनाच्या संकटात ICMRने दिली दिलासादायक माहिती

CoronaVirus News : नववीतल्या विद्यार्थ्यानं तयार केली वेबसाईट; कोरोनाच्या खात्रीशीर माहितीचं संकलन

English summary :
mitron users gets maharashtra cyber cell advisory to delete it now

Web Title: mitron users gets maharashtra cyber cell advisory to delete it now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.