CoronaVirus Marathi News yogi sets record covid testing 485 crore persons in up | CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'या' राज्याचा रेकॉर्ड; तब्बल 4.85 कोटी लोकांचं केलं स्क्रिनिंग

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'या' राज्याचा रेकॉर्ड; तब्बल 4.85 कोटी लोकांचं केलं स्क्रिनिंग

लखनऊ - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 7 हजार 615 झाली आहे. यापैकी 5 हजार 815 जणांचा मृत्यू झाला. तर यापैकी 50 टक्के म्हणजेच तब्बल 1 लाख 303 लोक कोरोनातून ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने एक नवा रेकॉर्ड केला आहे. कोविड 19 च्या वैद्यकीय तपासणीबाबत नवीन विक्रम केला आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये आतापर्यंत 4.85 कोटी लोकांचं कोरोना व्हायरसचं स्क्रिनिंग करण्यात आलं आहे, जो एक रेकॉर्ड झाला आहे. कोरोनाच्या वैद्यकीय तपासणीसाठी उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाच्या पथकांनी 78 लाखांहून अधिक घरांमध्ये जाऊन नागरिकांचं स्क्रिनिंग करण्यात आलं. राज्यात आतापर्यंत तब्बल 4.85 कोटी लोकांचं स्क्रिनिंग करण्यात आले आहे. लोकांच्या तपासणीसाठी राज्यात आरोग्य विभागाच्या एक लाखाहून अधिक पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही टीम प्रत्येक घरी जाऊन स्क्रिनिंग करत असल्याचं देखील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.  

वैद्यकीय टीममध्ये आशा (मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कर्मचारी) सेविकांचादेखील समावेश आहे. तसेच कोरोना संशयितांच्या देखरेखीसाठी आणि विलगीकरण केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी गावपातळीवर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. समित्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गाव पातळीवरील विकासाची माहिती दिली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची तपासणीत मदत केली. देशात कोरोनामुळे तब्बल पाच हजारांहून अधिक लोकांना आपली जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) एक दिलासादायक माहिती दिली आहे. 

ICMR ने देशामध्ये कोरोना व्हायरस पीक सीझन (Peak) देशात येण्यासाठी अद्याप बराच काळ आहे असं म्हटलं आहे. कोरोनाच्या प्रकरणांमध्ये रोज 8000 हजार नवीन रुग्णांची नोंद होत आहे. यावरून भारतात कोरोनाचा पीक सीझन आल्याचे मानले जात होते. मात्र ICMRच्या संशोधक डॉ. निवेदिता गुप्ता यांनी भारत कोरोनाच्या पीकपासून खूप दूर आहे अशी माहिती दिली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आमचे प्रयत्न आणि सरकारने घेतलेले निर्णय खूप प्रभावी असल्याचं सिद्ध होत आहे. हेच कारण आहे की इतर देशांपेक्षा आपली परिस्थिती बर्‍यापैकी चांगली आहे असं म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : ...अन् संरक्षणासाठी न्यायालयात गेलेल्या नवविवाहीत जोडप्याला ठोठावला 10 हजारांचा दंड

Cyclone Nisarga : अरविंद केजरीवालांनी केलं उद्धव ठाकरेंसाठी ट्विट; म्हणाले...

CoronaVirus News : देशातील रुग्णांची संख्या 2 लाखांवर; कोरोनाच्या संकटात ICMRने दिली दिलासादायक माहिती

CoronaVirus News : नववीतल्या विद्यार्थ्यानं तयार केली वेबसाईट; कोरोनाच्या खात्रीशीर माहितीचं संकलन

CoronaVirus News : आनंदाची बातमी! माणसांप्रमाणे आता प्राण्यांसाठी कोरोनाची लस येणार, भविष्यातील धोका टळणार

English summary :
CoronaVirus Marathi News yogi sets record of covid testing 4 85 crore persons in uttar pradesh

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News yogi sets record covid testing 485 crore persons in up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.