भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 15:55 IST2025-10-22T15:54:42+5:302025-10-22T15:55:50+5:30
WhatsApp आणि Instagram सह मेटाच्या प्लॅटफॉर्मवर चॅटिंग अधिक सुरक्षित होणार आहे.

फोटो - AI
WhatsApp आणि Instagram सह मेटाच्या प्लॅटफॉर्मवर चॅटिंग अधिक सुरक्षित होणार आहे. कंपनीने लोकांना स्कॅमपासून वाचवण्यासाठी नवीन फीचर्स लाँच केली आहेत. ही फीचर्स विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन डिझाइन केली आहेत. हे लक्षात घेण्यासारखं आहे की अलीकडे ऑनलाइन स्कॅम वाढले आहेत आणि स्कॅमर ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करत आहेत.
WhatsApp वर युजर्सनी आता अनोळखी कॉलरसोबत व्हिडीओ कॉल दरम्यान त्यांची स्क्रीन शेअर केल्यास त्यांना अलर्ट दिसेल. स्कॅमर बहुतेकदा डिजिटल अरेस्टसारख्या प्रकरणांमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे लोकांना टार्गेट करतात. मेसेंजरबद्दल, कंपनी चॅटसाठी एआय-संचालित स्कॅम शोधण्याचं साधन विकसित करत आहे. युजर्स एआय रिव्ह्यूसाठी नवीन संपर्कांसह त्यांचे चॅट पाठवू शकतील. जर कोणतेही धोके आढळले तर युजर्सना योग्य मार्गदर्शन प्रदान केले जाईल.
मेटाने फेसबुक, मेसेंजर आणि WhatsApp सह त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मसाठी पासकी सपोर्ट सुरू केला आहे. युजर्स फेस व्हेरिफिकेशन किंवा फिंगरप्रिंट सारख्या डिव्हाइस-लेव्हल ऑथेंटिकेशनचा वापर करून साइन इन करू शकतात. मेटाने लोकांना फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुरक्षा तपासणी आणि WhatsApp वर प्रायव्हसी चेकअप वापरण्याचे आवाहन केले आहे.
मेटाने सांगितलं की ते दूरसंचार विभागाच्या सहकार्याने "स्कॅम से बचो" मोहीम सुरू करणार आहे. ही मोहीम ज्येष्ठ नागरिकांना व्हिडीओ कंटेंटद्वारे होणारे स्कॅम कसे ओळखायचे आणि कसे टाळायचे याबद्दल शिक्षित करेल. कंपनी सक्षम ज्येष्ठ मोहिमेला देखील समर्थन देईल, जी ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता आणि सुरक्षा सेशन आयोजित करते.