जर तुम्ही WhatsApp वर मोठा व्हिडीओ स्टेटसला टाकण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मेटा आपल्या WhatsApp प्लॅटफॉर्मवर स्टेटस लिमिट वाढवणार आहे. अनेकदा स्टेटसवर व्हिडीओ हे कट करून लावावे लागत होते. पण यामुळे युजर्सना फायदा होईल. आतापर्यंत तुम्ही WhatsApp स्टेटसवर एका वेळी ६० सेकंदांचा व्हिडीओ टाकू शकत होता. त्याची लिमिट वाढवण्यात येत आहे.
तुम्ही तुमच्या WhatsApp स्टेटसमध्ये ६० सेकंदांऐवजी ९० सेकंदांचा व्हिडीओ टाकू शकाल. हे फीचर सध्या बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. बीटा युजर्स हे एपच्या टेस्टिंग व्हर्जनचा वापर करत असतात. कोणत्याही एपच्या बीटा व्हर्जनमध्ये बग्स असू शकतात. अशा परिस्थितीत, कंपन्या युजर्सना मुख्य व्हर्जन प्रदान करतात. बीटा व्हर्जनवर हे फीचर आल्याने ते लवकरच सर्वसामान्यांसाठी देखील उपलब्ध होईल.
WhatsApp च्या या लेटेस्ट फीचरची माहिती WABetaInfo नावाच्या विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे. हे फीचर WhatsApp चं अँड्रॉइड व्हर्जन २.२५.१२.९ वर उपलब्ध असेल. या अपडेटनंतर युजर्स त्यांच्या स्टेटसमध्ये एकाच वेळी ९० सेकंदांचा व्हिडीओ टाकू शकतील. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला ३० सेकंदांची मर्यादा १ मिनिटापर्यंत वाढवण्यात आली होती.
हे फीचर तुमच्यासाठी उपलब्ध आहे का हे तपासण्यासाठी, तुम्ही गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुमचं एप अपडेट केलेले आहे का ते तपासू शकता. एप अपडेट करा आणि स्टेटस टॅबवर जा आणि पाहा की तुम्ही ९० सेकंदांचा व्हिडीओ अपलोड करू शकता की नाही? जर तुम्ही बीटा युजर्स असाल, जर तुमच्याकडे अँड्रॉइड २.२५.१२.९ व्हर्जन उपलब्ध असेल, तर एप अपडेट करा. यानंतर तुम्ही एका वेळी ९० सेकंदांचा व्हिडीओ अपलोड करू शकाल.