मेटाकडून Threads अ‍ॅप लाँच, Twitter ला देणार टक्कर! जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 09:11 AM2023-07-06T09:11:26+5:302023-07-06T09:18:58+5:30

Threads App Launched : थ्रेड्स अ‍ॅप 100 हून अधिक देशांमध्ये अ‍ॅपल आणि गुगल अँड्राईड अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे.

Meta launches Instagram Threads in a direct challenge to Elon Musk's Twitter | मेटाकडून Threads अ‍ॅप लाँच, Twitter ला देणार टक्कर! जाणून घ्या फीचर्स...

मेटाकडून Threads अ‍ॅप लाँच, Twitter ला देणार टक्कर! जाणून घ्या फीचर्स...

googlenewsNext

मार्क झुकरबर्ग यांच्या मेटाने थ्रेड्स (Threads ) अ‍ॅप लाँच केले आहे. हे अ‍ॅप इलॉन मस्क यांच्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरला (Twitter ) टक्कर देण्याची शक्यता आहे. मेटाने थ्रेड्स अ‍ॅपमध्ये ट्विटरसारखे सर्व फीचर्स दिले आहेत. यामध्ये पोस्टची लिमिट 500 वर्ड्सची दिली जात आहे, जी ट्विटरच्या 280 वर्ड्स लिमिटपेक्षा जास्त आहे आणि त्यात पाच मिनिटांपर्यंतच्या लिंक्स, फोटो आणि व्हिडिओंचा समावेश असू शकतो.

थ्रेड्स अ‍ॅप अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जपानसह 100 हून अधिक देशांमध्ये अ‍ॅपल आणि गुगल अँड्राईड अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. म्हणजेच आता यूजर्स अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून ट्विटरचे रिव्हल अ‍ॅप थ्रेड्स इंस्टॉल करून याचा फायदा घेऊ शकतात. मेटाचे मुख्य कार्यकारी मार्क झुकरबर्ग यांच्या थ्रेड्सवरील पोस्टनुसार, हे अ‍ॅप 1 बिलियनहून अधिक युजर्ससह पब्लिक कन्व्हर्सेशन अ‍ॅप असल्याचे सिद्ध होण्याची शक्यता आहे.

जाणून घ्या फीचर्स...
थ्रेड्स हे इंस्टाग्रामचे एक नवीन अ‍ॅप आहे, जे युजर्सना टेक्स्ट, लिंक शेअर करण्याची आणि इतर युजर्सच्या मेसेजना उत्तर देऊन किंवा पुन्हा पोस्ट करून कन्व्हर्सेशनमध्ये सामील होण्याची कॅपॅबिलिटी देते. अ‍ॅप युजर्सना आपल्या विद्यमान इंस्टाग्राम अकाउंट युजर्सच्या नावाने लॉग-इन करण्याची आणि आपल्या फॉलोअर्सच्या लिस्टला फॉलो करण्याची परवानगी देते. म्हणजेच, यासाठी तुम्हाला वेगळे युजर्सचे नाव सेट करण्याची गरज नाही. दरम्यान, मेटा हे लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा युजर्स बेस 2 बिलियनपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये टॉप ब्रँड, प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि कंटेंट क्रिएटर्स सामील आहेत.

ट्विटरला देऊ शकते टक्कर!
रिपोर्ट्सनुसार, थ्रेड्सला Mastodon आणि Decentralized Social Media Apps सारखे ActivityPub सोशल-नेटवर्किंग प्रोटोकॉलवर तयार करण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की, जे युजर्स थ्रेड्सवर फॉलोअर्स बनवतात, ते इंस्टाग्रामशिवाय मोठ्या स्तरावर युजर्ससोबत संवाद साधू शकतील. यूजर्सला या अ‍ॅपमध्ये ट्विटरसारखा अनुभव मिळेल, या अ‍ॅपमध्ये तुम्हाला ट्विटरसारखेच फीचर्स मिळत आहेत. म्हणजेच हे अ‍ॅप ट्विटरला थेट टक्कर देण्याची तयारी करत आहे. अनेक दिवसांपासून ट्विटरवर सुरू असलेल्या बदलांमुळे नाराज झालेल्या ट्विटर युजर्सना आता ट्विटरसारखे अ‍ॅप मिळणार आहे.

Threads कसे करावे इंस्टॉल?
- सर्वात आधी Google Play Store वर जा आणि "Thread, an Instagram app" टाइप करा आणि अ‍ॅप इंस्टॉल करा.
- यानंतर Login with Instagram चा ऑप्शन मिळेल. यानंतर तुमच्या WhatsApp वर लॉगिन कोड येईल, तो याठिकाणी भरा.
- हे केल्यानंतर, "Import from Instagram" वर क्लिक करा. यानंतर ते इंस्टावरून तुमच्या प्रोफाइलमध्ये अ‍ॅक्सेस करेल.
- स्क्रीनच्या खाली दिसत असलेल्या Continue च्या ऑप्शनवर क्लिक करा.
- अटी आणि नियम वाचून Continue करा. यानंतर फॉलो सेम अकाउंट्स (ज्याला तुम्ही इन्स्टाग्रामवर फॉलो करता) वर क्लिक करा.
- आता "Join Threads" वर क्लिक करा. अ‍ॅपल युजर्स देखील हीच प्रक्रिया फॉलो करून अ‍ॅप वापरू शकतात.

Web Title: Meta launches Instagram Threads in a direct challenge to Elon Musk's Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.