शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

सर्वसामान्यांसाठी खूशखबर! रेशन कार्ड धारकांसाठी Mera Ration App लाँच; एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 3:37 PM

Mera Ration Mobile App : One Nation-One Ration Card च्या पावलावल पाऊल टाकत आता Mera Ration हे मोबाईल अ‍ॅप लाँच करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - सर्वसामान्यांसाठी आता एक खूशखबर आहे. मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी भारतात Mera Ration नावाचं Mobile App लाँच केलं आहे. ज्यामध्ये गरजू म्हणजेच गरीब कुटुंबीतील लोकांना Fair Price Shop सोबत रेशन कार्डमध्ये आपली सध्याची स्थिती आणि रेशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या सुविधांबाबत सर्व माहिती मिळू शकणार आहे. Mera Ration mobile app हे Androd Smartphones साठी लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे गुगल प्ले स्टोरवरून युजर्स हे डाऊनलोड करू शकतात. सध्या भारतात कुटुंबातील एका सदस्याकडे तरी स्मार्टफोन असतो. त्यामुळे मोबाईलवर सरकारी योजना आणि मिळणारा लाभ याची पूर्ण माहिती मिळू शकते

One Nation-One Ration Card च्या पावलावल पाऊल टाकत आता Mera Ration हे मोबाईल अ‍ॅप लाँच करण्यात आलं आहे. रेशन कार्ड धारक जर आपलं निवासस्थान बदलून नवीन ठिकाणी जात असेल तर ते मोबाईल अ‍ॅपवर अधिक माहिती मिळवू शकतात. जवळ कोणतं रेशन दुकान आहे. त्या ठिकाणी कोणकोणत्या सुविधा दिली जात आहेत हे पाहू शकतात. सरकारी डेटानुसार, देशात 69 कोटी लोक हे National Food Security Act (NFSA) चा फायदा लोक घेत आहेत. त्यांना सर्व सुविधा मिळत आहे. याचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

14 भाषेत लवकरच होणार उपलब्ध

National Food Security Act (NFSA) नुसार, या अ‍ॅक्टचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड धारकांना Public Distribution System (PDS) द्वारे केवळ 1 रुपये ते 3 रुपये प्रति किलोग्रॅम या प्रमाणे धान्य मिळते. ही सुविधा 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमधील कोट्यवधी लोकांना मिळत आहे. आता माझे रेशन अ‍ॅप द्वारे याचा लोकांना फायदा होणार आहे. सध्या हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत दिले आहे. मात्र आता लवकरच 14 भाषेत उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

असं करा डाऊनलोड

Mera Ration mobile app चा वापर करणं सोपं आहे. सर्वप्रथम हे अ‍ॅप डाऊनलोड करा. गुगल प्ले स्टोरवर तुम्हाला Central AEPDS Team द्वारा डिवेलप केलेले अ‍ॅप मिळेल. डाऊनलोड झाल्यानंतर आपला मोबाईल नंबर यात रजिस्टर करा. रजिस्टर झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड नंबर मागितले जाईल. नंबर टाकल्यानंतर सबमिट करा. मग रेशन कार्डसंबंधी सर्व माहिती मिळू शकेल. तसेच या अ‍ॅपवर युजर्सना गेल्या सहा महिन्यातील ट्रान्झॅक्शन आणि आधार सीडिंगची पूर्ण माहिती तुम्हाला मोबाईलवर मिळू शकेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

 

टॅग्स :Indiaभारतtechnologyतंत्रज्ञान