Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:40 IST2025-10-13T13:38:28+5:302025-10-13T13:40:33+5:30

Mappls: MapmyIndia कंपनीनं तयार केलेलं Mappls अॅप Google Maps ला तगडं आव्हान देत आहे.

Mappls Map, 'Made in India' app to compete with Google Maps; Gets many features including 3D navigation, | Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...

Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...

Mappls:भारतामध्ये विकसित करण्यात आलेलं ‘Mappls’ App सध्या देशभरात चर्चेत आलं आहे. MapmyIndia कंपनीने तयार केलेल्या या स्वदेशी App मध्ये व्हॉईस गाइडेड नेव्हिगेशन, रिअल-टाइम ट्रॅफिक अपडेट्स आणि हायपर-लोकल सर्च...अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळेच हे App गुगल मॅप्सचा मजबूत भारतीय पर्याय ठरत आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच स्वतः या App चा वापर करत असलेला एक व्हिडिओ शेअर केला आणि भारतीयांना हे App नक्की वापरून पहा, असं आवाहनदेखील केलं. सरकारच्या मते, हा उपक्रम डिजिटल आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे.

कोणते फीचर्स मिळतात ?

Mappls Appचं सर्वात महत्वाचं फीचर म्हणजे त्याचा 3D जंक्शन व्यू. या फीचर युजर्सना फ्लायओव्हर, अंडरपास आणि गुंतागुंतीच्या रस्त्यांची थ्री-डी इमेज पाहता येते, ज्यामुळे चुकीच्या रस्त्यावर जाण्याची किंवा अपघाताची शक्यता कमी होते. हे फीचर विशेषतः चर्चेत येण्याचं म्हणजे, 2024 मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या एका दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला होता. गुगल मॅपने अपूर्ण पुलाचा रस्ता दाखवल्यामुळे गाडी थेट पुलावरुन नदीत कोसळली होती.

Mappls ची हे अपडेटेड सिस्टम अशा प्रकारच्या धोक्यांपासून बचाव करण्यात मदत करेल. याशिवाय, या App मध्ये इनडोअर नेव्हिगेशनची सुविधाही आहे, जी मॉल्स किंवा मल्टी-स्टोरी इमारतींमध्ये अचूक मार्ग दाखवते. ही सुविधा बहुतांश आंतरराष्ट्रीय मॅप Apps मध्ये अद्याप उपलब्ध नाही.

डेटा प्रायव्हसी 

Mappls चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे डेटा प्रायव्हसी. इतर ग्लोबल Apps प्रमाणे हे यूझरचा डेटा परदेशी सर्व्हरवर पाठवत नाही. त्याऐवजी संपूर्ण माहिती भारतातील सर्व्हरवरच सेव्ह केली जाते. त्यामुळे डेटा लीक किंवा परकीय निगराणीचा धोका कमी होतो. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, लवकरच भारतीय रेल्वेसोबत MoU करण्यात येईल. यामुळे रेल्वे स्थानकं आणि मार्गांच्या नेव्हिगेशनमध्येही अधिक अचूकता येईल.

DIGIPIN ची सुविधा

MapmyIndia नं इंडिया पोस्ट, IIT हैदराबाद आणि ISROच्या NRSC विभागासह मिळून ‘DIGIPIN’ नावाची नवी प्रणाली विकसित केली आहे. या अंतर्गत भारतातील प्रत्येक 3.8 मीटर क्षेत्रफळाला एक युनिक डिजिटल कोड दिला जाणार आहे. युजर्स फक्त मॅपवर पिन लावून आपला डिजिटल अ‍ॅड्रेस तयार करू शकतात. यामुळे घर, मजला किंवा इमारतीची अचूक ओळख सांगणं सोपं होईल. ग्रामीण भागांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

स्वदेशी टेक्नॉलॉजी मिशनला नवी गती

Mappls चं आगमन हे भारतातील स्वदेशी टेक्नॉलॉजी चळवळीचं आणखी एक यश आहे. यापूर्वी Zoho कंपनीचs ‘Arattai’ चॅट App लोकप्रिय झालं. डेटा सुरक्षेवर भर, भारतीय सर्व्हरवर आधारित प्रणाली आणि ‘डिजिटल आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेशी सुसंगत दृष्टिकोनामुळे Mappls आता Google Maps ला पर्याय ठरत आहे. सरकारचा पाठिंबा आणि युजर्सचा वाढता विश्वास पाहता, हे App भारताला डिजिटल स्वावलंबनाच्या नव्या दिशेनं नेणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

Web Title : मैपल: 3डी नेविगेशन के साथ गूगल मैप्स को टक्कर देने वाला भारतीय ऐप

Web Summary : मैपमाईइंडिया द्वारा निर्मित 'मेड इन इंडिया' ऐप मैपल, वॉयस-निर्देशित नेविगेशन, रीयल-टाइम ट्रैफिक अपडेट और 3डी जंक्शन व्यू प्रदान करता है। यह भारतीय सर्वरों पर डेटा संग्रहीत करके डेटा गोपनीयता को प्राथमिकता देता है। ऐप में डिजीपिन, एक अद्वितीय डिजिटल एड्रेस सिस्टम भी है, जो स्वदेशी तकनीक को बढ़ावा देता है।

Web Title : Mappls: India's answer to Google Maps with 3D navigation features.

Web Summary : Mappls, a 'Made in India' app by MapmyIndia, offers voice-guided navigation, real-time traffic updates, and 3D junction views. It prioritizes data privacy by storing data on Indian servers. The app also features DIGIPIN, a unique digital address system, boosting indigenous technology.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.