शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
3
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
4
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
5
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
6
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
7
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
8
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
9
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
10
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
11
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
12
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
13
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
14
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
15
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
16
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
17
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
18
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
19
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
20
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: फोटो, व्हिडिओ आणि फिल्टरमागचा AI

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 13:46 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: या सगळ्यांच्या मागे कार्यरत असलेली अदृश्य शक्ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता-एआय.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आज आपण मोबाइल उघडला की सुंदर फोटो, आकर्षक व्हिडिओ आणि चेहऱ्यावर जादुई बदल करणारे फिल्टर सहज पाहायला मिळतात. एखादा साधा फोटो एका क्लिकमध्ये प्रोफेशनल दिसतो, व्हिडिओमध्ये पार्श्वसंगीत आपोआप जुळते, तर चेहरा ओळखून डोळे, त्वचा, केस बदलणारे फिल्टर आपल्याला थक्क करतात. या सगळ्यांच्या मागे कार्यरत असलेली अदृश्य शक्ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता-एआय.

फोटो एडिटिंगमधील एआय

पूर्वी फोटो एडिटिंगसाठी तासन्तास मेहनत घ्यावी लागायची. आज एआय आधारित अॅप्स फोटोतील चुका आपोआप दुरुस्त करतात. तेही काही सेकंदात.

फेस डिटेक्शन : एआय फोटोतील चेहरा ओळखतो आणि डोळे, नाक, ओठ यांची अचूक जागा शोधतो.

ऑटो एन्हान्समेंट : प्रकाश कमी असेल तर उजळ करणे, रंग फिके असतील तर नैसर्गिक रंग आणणे हे त्याचे काम.

बॅकग्राउंडमधील बदल : व्यक्ती वेगळी ओळखून मागचा भाग काढून टाकणे किंवा बदलणे. यामुळे सामान्य माणूसही छायाचित्रकारासारखे फोटो तयार करु शकतो.

एआय म्हणजे नेमकं काय?

एआय-संगणकाला माणसासारखं विचार करायला, शिकायला आणि निर्णय घ्यायला सक्षम बनवणारी तंत्रज्ञान प्रणाली आहे. फोटो, व्हिडिओ आणि फिल्टरबाबतीत एआय डेटा वापरून शिकतो. लाखो फोटो-व्हिडिओ पाहून तो चेहरा ओळखतो, रंग समजतो, प्रकाशाचा अंदाज घेतो आणि मग योग्य बदल सुचवतो.

कसा काम करतो?

एआय फ्रेमचा अभ्यास करतो आणि व्हिडीओ तयार करतो. महत्त्वाचे क्षण ओळखून व्हिडिओ छोटा करणे. वेगवेगळे इफेक्ट्स लावणे. आवाज ओळखून सबटायटल्स तयार करणे, सोशल मीडियावरील व्हिडिओ, रील्स, शॉर्ट्स यांच्या बाबतीत एआयशिवाय कल्पनाच करता येत नाही.

खरी जादू

फेस मॅपिंग : चेहऱ्यावर हजारो बिंदू (पॉइंट्स, पिक्सेल्स) ओळखून त्यावर बदल करणे.

रिअल-टाइम प्रोसेसिंग : कॅमेरा चालू असतानाच चेहरा बदलणे.

एआर (ऑग्मेंटेड रियल्टी) : आभासी वस्तू प्रत्यक्ष चेहऱ्यावर बसवल्यासारख्या दाखवणे हे यामुळेच शक्य होते. म्हणूनच हसताच फिल्टर नीट बसतो आणि डोके हलवले तरी तो जागेवर राहतो.

धोके

डीपफेक : खोटे व्हिडिओ तयार होण्याचा धोका जास्त.

अतिशयोक्ती सौंदर्यदृष्टी : खऱ्या चेहऱ्यापेक्षा फिल्टरचा चेहरा स्वीकारला जाणे.

गोपनीयता : फोटो-व्हिडिओचा गैरवापर.

फायदे काय?

सर्जनशीलतेला चालना. वेळ-मेहनत वाचते.

प्रोफेशनल साधने वापरता येतात.

नवे प्रयोग शक्य.

Al Behind Photos, Videos & Filters

Artificial Intelligence (Al) helps modern apps recognize faces, improve photo quality, edit videos automatically, and apply real-time filters. Al uses face mapping and data learning to adjust lighting, colors, and effects smoothly, even when the face or camera moves.

Moral: Al is a powerful creative tool, but it should be used responsibly.

निष्कर्ष

योग्य वापर केला तर तो सर्जनशीलता, संवाद आणि शिक्षणाला नवी दिशा देऊ शकतो. मात्र अतिरेक टाळून, सत्य आणि जबाबदारी जपत एआयकडे पाहणे हीच काळाची गरज आहे.

इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)
 

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat: AI's magic behind photos, videos, and filters revealed.

Web Summary : AI powers today's stunning photos and videos. It enhances images, recognizes faces, and creates amazing filters. While offering creative potential, responsible use is vital to avoid deepfakes and privacy issues. AI can revolutionize communication and learning if wielded ethically.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतtechnologyतंत्रज्ञान