शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI सर्वच ठिकाणी असूनही तुम्हाला तो जाणवतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 13:09 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: सगळं AI करत असतानाही, तो आपल्या आजुबाजूला आहे असं आपल्याला फारसा जाणवतच नाही.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजचे जग फार वेगाने बदलत आहे. विद्यार्थ्याला शाळेत जाताना बस कुठपर्यंत आली हे मोबाइलवर लगेच कळतं, अभ्यासासाठी प्रश्न टाकला की लगेच आपल्याला उत्तर मिळतं, आपण चित्र काढायला सांगितलं की, स्क्रीनवर सुंदर चित्र काढून मिळतं. हे सगळं पाहून अनेक मुलांच्या मनात एक प्रश्न नकळत तयार होतो 'हे सगळं कोण करतं?' उत्तर आहे - Artificial Intelligence, म्हणजेच AI. मात्र, गंमत अशी आहे की इतकं सगळं AI करत असतानाही, तो आपल्या आजुबाजूला आहे असं आपल्याला फारसा जाणवतच नाही.

आपण ज्या जगात वावरतो, त्या जगात AI एखाद्या मोठ्या मशीनसारखा समोर उभा नाही, किंवा एखाद्या रोबोटसारखा आपल्याशी बोलतही नाही. तो आपल्या दैनंदिन सवयींमध्ये इतका सहज मिसळला आहे की, तो वेगळा आहे, असं वाटण्याची गरजच उरलेली नाही. म्हणूनच 'AI सर्वत्र आहे' असं ऐकल्यावरही अनेकांना तो दिसत नाही, जाणवत नाही, कारण तो आता आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. आपण मोबाइल बघतो तेव्हा हवामानाचा अचूक अंदाज कळतो. मॅपवर ट्रॅफिक समजते. आपली आवडती बातमी स्क्रीनवर दिसते. ही सगळी माहिती आपल्या सवयींनुसार आणि आवडीनुसार निवडून देणारा हा 'एआय'च असतो. यूट्यूब, इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर कोणता व्हिडीओ सर्वांत आधी दिसावा, कोणती जाहिरात आपल्यासाठी योग्य आहे किंवा नाही हे निर्णयही एआयच घेतो.

'एआय' आपलं काम अविरतपणे करत असते

हे सर्व घडत असताना आपल्याला जाणवतही नाही कारण तो गोंगाट करत नाही; तो शांतपणे काम करतो. जसा पंखा फिरतो. मात्र, वीज आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे एआयही दिसत नाही. परिणाम मात्र दिसतात.

बँकेत पैसे ट्रान्सफर होणं, ऑनलाइन शॉपिंग करताना योग्य प्रॉडक्ट सुचवणं, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अंदाज घेणं या सगळ्यांमागे एआय असतो. 'एआय'ने मदत करावी म्हणूनच त्याला तयार करण्यात आला आहे. तो शिक्षकांचा पर्याय मुळीच नाही, तो शिक्षकाचा मजबूत सहकारी मात्र आहे.

तो पालकाची जागा घेत नाही, मात्र पालकांना आणि मुलांना समजून घेण्यासाठी नेहमी मदत करतो. तो माणसावर राज्य करायला तर मुळीच आलेला नाही, तर मानवी आयुष्य सोपं आणि सुखकर करायला आलेला आहे. म्हणूनच AI सर्वत्र असूनही तो जाणवत नाही, कारण तो रोबोटसारखा आपल्या समोर उभा राहत नाही. मात्र, एआय आपले काम अविरतपणे कुणालाही न दिसता करत राहतो.

शालेय जीवनात 'एआय'

वैयक्तिक शिक्षण AI मुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण देता येते. शिकण्याची गती, आवड आणि अडचणी ओळखून अभ्यासक्रम तयार करता येतो. त्यामुळे विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने शिकतो, समज वाढते आणि शिकण्याचा अनुभव अधिक प्रभावी व आनंददायी बनतो.

शिक्षकांची भूमिका

AI शिक्षकांना पर्याय नाही तर सहायक आहे. गुणांकन, अहवाल तयार करणे आणि डेटा विश्लेषण यांसारखी कामे AI करतो. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांशी संवाद, मार्गदर्शन आणि सर्जनशील अध्यापनावर अधिक लक्ष देता येते.

मूल्यांकन व अभिप्राय

AI आधारित मूल्यांकन प्रणाली त्वरित आणि अचूक अभिप्राय देते. विद्यार्थ्यांच्या चुका ओळखून सुधारणा सुचवते. त्यामुळे सतत मूल्यांकन शक्य होते, परीक्षेचा ताण कमी होतो आणि शिकण्याची गुणवत्ता वाढते.

डिजिटल समावेशन

AI मुळे ग्रामीण व वंचित भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकते. भाषांतर, आवाजावर आधारित शिक्षण आणि ऑनलाइन साधनांमुळे सर्वांसाठी समान संधी निर्माण होतात. यामुळे शिक्षणातील दरी कमी करण्यास मदत होते.

कौशल्यविकास

AI शिक्षण व्यवस्थेत भविष्यकालीन कौशल्यांवर भर देतो. कोडिंग, समस्या सोडवणे, विश्लेषणात्मक विचार आणि सर्जनशीलता विकसित होते. विद्यार्थी फक्त पाठांतर न करता उपयोगी ज्ञान आत्मसात करतात.

आव्हाने व जबाबदारी

AI चा वापर करताना गोपनीयता, डेटा सुरक्षितता आणि नैतिकता महत्त्वाची आहे.

- इंजि. अविनाश जाधव (Al & Technology Educator) 

English
हिंदी सारांश
Web Title : The Amazing World of Lokmat AI: Is AI Really Everywhere?

Web Summary : AI quietly transforms daily life, from personalized news to education. It aids teachers, empowers students, and enhances learning. Focus on skill development and ethical use are key.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतTeacherशिक्षकStudentविद्यार्थीStudentविद्यार्थीEducationशिक्षण