शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय एजंट्स : तुमचा डिजिटल सहायक! वापर वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:59 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: भविष्यात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात, ऑफिसमध्ये आणि दैनंदिन जीवनात त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजचे जग वेगाने आ बदलत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मुळे संगणक अधिक हुशार होत आहेत. सुरुवातीला एआय फक्त प्रश्नांची उत्तरे देत होते किंवा माहिती शोधून देत होते; पण आता तंत्रज्ञान आणखी पुढे गेलेले आहे. 'एआय एजंट्स' नावाची नवी संकल्पना समोर येत आहे. हे एआय एजंट्स म्हणजे असे डिजिटल सहायक आहेत जे फक्त माहिती देत नाहीत, तर अनेक कामे स्वतः करून दाखवतात. भविष्यात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात, ऑफिसमध्ये आणि दैनंदिन जीवनात त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे.

एआय एजंट म्हणजे नेमके काय?

एआय एजंट म्हणजे असा संगणकीय प्रोग्राम जो एखादे उद्दिष्ट दिल्यावर त्यासाठी आवश्यक माहिती शोधतो, परिस्थिती समजून घेतो, निर्णय घेतो आणि ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याने 'पाण्याचे संवर्धन' या विषयावर प्रोजेक्ट तयार करायचा आहे, असे सांगितले तर एआय एजंट त्या विषयावर माहिती गोळा करेल, महत्त्वाचे मुद्दे तयार करेल, चित्रे सुचवेल आणि प्रेझेंटेशन कसे बनवायचे याबद्दल मार्गदर्शनही करु शकतो. म्हणजेच तो फक्त सल्ला देत नाही, तर कामाची संपूर्ण प्रक्रिया सोपी करतो.

एआय एजंट्स विद्यार्थ्यांना असा मदत करू शकतात

गृहपाठ समजावून सांगणे.
कठीण प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शन.
अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे.
प्रोजेक्टसाठी माहिती गोळा करणे.
भाषा शिकण्यासाठी मदत करणे.
परीक्षेपूर्वी सराव प्रश्न देणे. 

यामुळे विद्यार्थ्यांना जणू शिक्षकाची मदत मिळाल्यासारखे वाटते. एआय एजंट म्हणजे असा संगणकीय प्रोग्राम जो एखादे उद्दिष्ट दिल्यावर त्यासाठी आवश्यक माहिती शोधतो, स्थिती समजून घेतो, निर्णय घेतो आणि ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. उदा. विद्यार्थ्याने 'पाण्याचे संवर्धन' यावर प्रोजेक्ट तयार करायचा आहे, असे सांगितले तर एआय एजंट फक्त सल्ला देत नाही, तर कामाची संपूर्ण प्रक्रिया सोपी करतो.

भविष्यातले डिजिटल शिक्षक

ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असते. अशा ठिकाणी इंटरनेट आणि संगणकाच्या मदतीने एआय एजंट्स डिजिटल शिक्षक म्हणून काम करु शकतात. विद्यार्थ्यांना एखादा विषय समजला नाही तर ते लगेच प्रश्न विचारू शकतात आणि त्याचे उत्तर मिळवू शकतात. त्यामुळे शिक्षण अधिक सुलभ, वेगवान आणि सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकते.

पण काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात

एआय एजंट्स खूप उपयुक्त असले, तरी त्यांचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
एआयवर पूर्ण अवलंबून राहू नये.
स्वतः विचार करण्याची सवय ठेवावी.
इंटरनेटवरील माहिती तपासून वापरावी.
तंत्रज्ञानाचा योग्य आणि जबाबदारीने वापर करावा.

Al Agent

A software system that can perform tasks automatically by understanding instructions, collecting information, making decisions and completing work using artificial intelligence. Technology will continue to change the world, but curiosity, creativity and the habit of learning will always remain the greatest strengths of students. Al agents should be used as helpful tools, not as a replacement for our own thinking.

भविष्यातील कामकाज बदलणार?

फक्त शिक्षणच नाही, तर अनेक कंपन्या ऑफिसमधील कामे सोपी करण्यासाठी एआय एजंट्स वापरण्याचा विचार करत आहेत. अभ्यासात उपयोग कसा होईल? एआय एजंट्समुळे शिक्षण अधिक सोपे आणि आकर्षक होऊ शकते.

इंजि. अविनाश जाधव (एआय अँड टेक एज्युकेटर)
 

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat AI: AI Agents – Your Digital Assistant! Usage to Increase.

Web Summary : AI Agents are digital assistants that perform tasks, not just provide information. They can help students with homework, projects, and language learning. While useful, AI should supplement, not replace, critical thinking. Companies are exploring AI agents to simplify office tasks, making education easier and more engaging.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतtechnologyतंत्रज्ञान