Jio चा दिवाळी धमाका! स्वस्त लॅपटॉप JioBook लाँच, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 04:50 PM2022-10-20T16:50:14+5:302022-10-20T16:50:46+5:30

JioBook : JioBook फक्त एका कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आले आहे.

jiobook price in india rs 15799 launch with 4g lte support | Jio चा दिवाळी धमाका! स्वस्त लॅपटॉप JioBook लाँच, जाणून घ्या किंमत...

Jio चा दिवाळी धमाका! स्वस्त लॅपटॉप JioBook लाँच, जाणून घ्या किंमत...

googlenewsNext

नवी दिल्ली : जिओने अधिकृतपणे आपला स्वस्त लॅपटॉप लाँच केला आहे. आता JioBook सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. ज्यांना परवडणारा लॅपटॉप घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हे डिव्हाइस एक चांगला पर्याय आहे. तुम्ही रिलायन्स डिजिटल स्टोअरवरून JioBook ऑनलाइन खरेदी करू शकता. यामध्ये मजबूत बॅटरी आणि सिम सपोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. जिओचा हा लॅपटॉप कॉम्पॅक्ट साइजमध्ये येतो. यात 11.5-इंचाचा डिस्प्ले आहे. काही दिवसांपूर्वी हे डिव्हाइस GEM पोर्टलवर दिसले होते. मात्र, कंपनीने हे अतिशय स्वस्त दरात लाँच केले आहे. JioBook ची किंमत आणि फिचर्स, जाणून घेऊया...

JioBook फक्त एका कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आले आहे. तुम्ही हा लॅपटॉप रिलायन्स डिजिटल ऑनलाइन स्टोअरमधून 15,799 रुपयांना खरेदी करू शकता. यावर बँक डिस्काउंट आणि इतर ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. तुम्ही नो-कॉस्ट EMI वर देखील डिव्हाइस खरेदी करू शकता. हे डिव्हाइस फक्त एकाच रंगाच्या पर्यायात Jio Blue मध्ये येते. लॅपटॉपच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा एलटीई सपोर्टेड डिव्हाइस आहे. म्हणजेच यामध्ये तुम्ही सिम कार्ड देखील वापरू शकाल. यामध्ये तुम्हाला 1366 x 768 पिक्सेल रिझोल्यूशनसह 11.6-इंचाचा डिस्प्ले मिळेल. लॅपटॉप ऑक्टा कोर CPU सह येतो.

हा डिव्हाइस Jio OS वर काम करतो. याची ऑपरेटिंग सिस्टीम खास JioBook साठी ऑप्टिमाइझ करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, डिव्हाइस 8 तासांपेक्षा जास्त बॅटरी लाइफसह येतो. तुम्हाला JioBook मध्ये प्री-इंस्टॉल केलेले अनेक अॅप्स मिळतील. डिव्हाइस 4G LTE सपोर्टसह येते, ज्याच्या मदतीने तुम्ही कधीही, कुठेही कनेक्ट राहू शकता. यामध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस अॅप्ससह जिओ अॅप्सचा अॅक्सेस मिळेल.

लॅपटॉपवर जिओ सावन आणि इतर अॅप्सना सपोर्ट करण्यात आला आहे. यामध्ये जिओ स्टोअर उपलब्ध आहे, जिथून तुम्ही अनेक अॅप्स डाउनलोड करू शकता. लॅपटॉपमध्ये सिम कार्डची सर्व्हिस अॅक्टिव्हेट करण्यासाठी युजर्सना जवळच्या जिओ स्टोअरला भेट द्यावी लागेल. डिव्हाइस स्टिरिओ स्पीकर आणि 2MP वेबकॅमसह येते. यात 2GB RAM, Octa-Core - 2.0 GHz, 64 bit, GPU - 950 MHz  प्रोसेसर आहे. Jio Book मध्ये 32GB स्टोरेज आहे, जे मायक्रो SD कार्डच्या मदतीने 128GB पर्यंत वाढवता येते.

Web Title: jiobook price in india rs 15799 launch with 4g lte support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.