शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

टेलिकॉम कंपन्यांची शानदार ऑफर्स! एका प्लॅनमध्ये मिळेल चार लोकांना डेटा, कॉलिंग आणि बरेच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 3:51 PM

postpaid family recharge plan : कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे प्लॅन येतात. असाच एक फॅमिली प्लॅन आहे, जो जिओच्या पोस्टपेड युजर्संना मिळतो. या प्लॅनमध्ये युजर्सला अनेक प्रकारचे फायदे मिळतात.

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्यांद्वारे ऑफर करण्यात येणारे पोस्टपेड प्लॅन्स निरनिराळ्या प्राईज रेंजमध्ये येतात. तुमच्या सुविधेसाठी आम्ही रिलायन्स जिओ (Reliance Jio), व्होडाफोन आयडिया (Vodafone-Idea), एअरटेल (Airtel) आणि बीएसएनएलच्या (BSNL)टॉप एन्ड फॅमिली प्लॅन्सबाबत माहिती देत आहोत. कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे प्लॅन येतात. असाच एक फॅमिली प्लॅन आहे, जो जिओच्या पोस्टपेड युजर्संना मिळतो. या प्लॅनमध्ये युजर्सला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. कॉल आणि डेटासह युजर्सला एसएमएस बेनिफिट्स सुद्धा मिळतात.

999 रुपयांचा जिओचा पोस्टपेड प्लॅनजिओ वैयक्तिक आणि फॅमिली दोन्ही युझर्ससाठी अनेक पोस्टपेड योजना ऑफर करते. जिओचा सर्वात महागडा कौटुंबिक पोस्टपेड प्लॅन 999 रुपयांचा आहे. जिओ आपल्या 999 रुपयांच्या प्लॅनसह तीन अतिरिक्त सिम कार्ड ऑफर करते. यामध्ये 200GB डेटा ऑफर केला जातो. तसेच 500GB डेटा रोलओव्हरही देण्यात येतो. याशिवाय, हा प्लॅन अमर्यादित व्हॉईस कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस ऑफर करतो. तसेच, जिओचा 999 रुपयांचा हा प्लॅन Netflix, Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar यांसह अनेक OTT प्लॅटफॉर्म्सच्या सबस्क्रिप्शनसह येतो.

799 रुपयांचा जिओचा पोस्टपेड प्लॅनजिओ आपल्या 799 रुपयांच्या प्लॅनसह दोन अतिरिक्त सिम कार्ड ऑफर करते. प्लॅन सुद्धा फॅमिली पोस्टपेड प्लॅन आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी बिलिंग सायकल सारखी असेल. यामध्ये युजर्सला 150GB डेटा आणि 200GB पर्यंत डेटा रोलओवर मिळतो. युजर्सला अमर्यादित व्हॉईस कॉल्स आणि दररोज 100 एसएमएसचे बेनिफिट्स दिले जाते. या प्लॅनमध्ये युजर्सला Netflix, Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळते. यासह युजर्स  Jio TV, जियो सिक्योरिटी आणि जियो क्लास सव्हिसेस सुद्धा युज करू शकतात.  

व्होडाफोन-आयडियाचा 2,299 रुपयांचा प्लॅनव्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) निरनिराळ्या युझर्ससाठी आणि कुटुंबासाठी निरनिराळे प्लॅन्स पोस्टपेड प्लॅन्स ऑफर करत आहे. फॅमिली युजर्ससाठी Vi चा हाय एन्ड प्लॅन 2,299 रुपयांचा आहे आणि हा एक RedX प्लॅन आहे. Vi चा RedX प्लॅन अनेक OTT सबस्क्रिप्शनसह अनेक फायद्यांसह यतो. प्लॅन कुटुंबातील 5 सदस्यांपर्यंत कनेक्टिव्हिटी ऑफर करतो आणि प्लॅनच्या प्राथमिक आणि दुय्यम कनेक्शनसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलसह दरमहा 3000 एसएमएससह अमर्यादित डेटा ऑफर करतो. RedX प्लॅनच्या फायद्यांबद्दस सांगायचे झाले तर ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय टीव्ही आणि मोबाइलवर Netflix चं एका वर्षाचं सबस्क्रिप्शन मिळवू शकतात. या प्लॅनमध्ये 1,499 रुपयांचे एक वर्षाचे Amazon प्राइम सबस्क्रिप्शन तसेच 499 रुपयांचे एका वर्षाचे Disney+ Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. याव्यतिरिक्त रेडएक्स प्लॅन कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ लाउंज सेवाही ऑफर करते.

एअरटेलचा 1,599 रुपयांचा प्लॅनएअरटेल काही फॅमिली पोस्टपेड प्लॅन्सदेखील ऑफर करते आणि कंपनीचा सर्वात हाय एन्ड फॅमिली इन्फिनिटी प्लॅन 1599 रुपयांचा आहे. Airtel 1,599 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये 500GB मासिक डेटा, अमर्यादित कॉल्स आणि 200GB पर्यंत डेटा रोलओव्हरसह दररोज 100 SMS मिळतात. प्लॅन 200 ISD मिनिटे आणि आयआर पॅकवर 10 टक्के सूट देखील देते. यामध्ये एका रेग्युलर सिम सोबत एकाच कुटुंबाच्या सदस्यांसाठी 1 मोफत अॅड ऑन रेग्युलर वॉईस कॉल कनेक्शन दिलं जातं. याशिवाय युझर्सना एअरटेल थँक्स प्लॅटिनम रिवॉर्ड्सही मिळतात. यामध्ये कोणत्याही अतिरिक्त किमतीत 1 वर्षासाठी प्राईम मेंबरशीपसह डिज्नी+हॉटस्टार व्हीआयपी मेंबरशीपही दिली जाते.

बीएसएनएलचा 999 रुपयांच्या प्लॅनबीएसएनएलच्या (BSNL) टॉप-एंड फॅमिली पोस्टपेड प्लॅन प्रायमरी कनेक्शनसोबत तीन फॅमिली कनेक्शन ऑफर करते. 999 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएससह अमर्यादित व्हॉइस कॉल मिळतात. प्रायमरी युझर्सना 225GB पर्यंतच्या डेटा रोलओव्हरसह 75GB मोफत डेटा मिळतो. सांगितल्याप्रमाणेच प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधेसह 3 फॅमिली कनेक्शन उपलब्ध आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी दररोज 75GB डेटा आणि 100 SMS दिले जातात. हा प्लॅन सुरू करण्यासाठी ग्राहकांना एकदाच 100 रुपये शुल्क भरावे लागेल. 

टॅग्स :JioजिओVodafoneव्होडाफोनReliance Jioरिलायन्स जिओIdeaआयडियाAirtelएअरटेलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान