WhatsApp तुमची हेरगिरी करत आहे? Google'ने संपूर्ण सत्य सांगितले, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 03:10 PM2023-06-22T15:10:59+5:302023-06-22T15:11:53+5:30

व्हॉट्सअॅप हेरगिरी करत असल्याच्या आरोप सर्वत्र सुरू आहे.

is whatsapp spying on you google clarifies android bug | WhatsApp तुमची हेरगिरी करत आहे? Google'ने संपूर्ण सत्य सांगितले, वाचा सविस्तर

WhatsApp तुमची हेरगिरी करत आहे? Google'ने संपूर्ण सत्य सांगितले, वाचा सविस्तर

googlenewsNext

WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या अॅपमुळे अनेकांची सर्व कामे सोप झाली आहेत.पण, हेच व्हॉट्स अॅप सध्या आपली हेरगिरी करत असल्याचा आरोप सुरू आहे. आता वापरकर्ते अॅपच्या प्रायव्हसी नोटिफिकेशन्स अचानक अधिक वारंवार दिसल्याबद्दल तक्रार करत आहेत. Android 12 डिव्हाइसेसवर हा प्रकार वाढला आहे. यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या फोनचा कॅमेरा किंवा मायक्रोफोन वापरताना सतर्क केले.WhatsApp साठी हे अलर्ट अनेक वेळा आले, यामुळे  अनेक वापरकर्त्यांनी तक्रारी केल्या. गोपनीयतेची समस्या असल्याचे यात म्हटले आहे, पण  Google ने या संदर्भात आता स्पष्टीकरण दिले आहे. हे एक बग असल्याचे म्हटले आहे.

सुंदर पिचईंनी शब्द पाळला; चीनला दणका दिला, गुगलची भारतात शोधाशोध सुरु

या संदर्भात अगोदर सूचना सामान्य होत्या. पण पण हा प्रोब्लेम आला की कॅमेरा किंवा मायक्रोफोन वापरात नसतानाही त्या दिसू लागल्या. यामुळे व्हॉट्सअॅप वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय कॅमेरा आणि मायक्रोफोनमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसले. यानंतर आता गुगलने स्पष्टीकरण दिले आहे. याचे कारण अँड्रॉइड बग होते, याने 'काही व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या फोनवर हा प्रोब्लेम दिसला.

Google ने त्याच्या Android Developers अकाउंटद्वारे ट्विटमध्ये स्पष्ट केले की, बग 'Android गोपनीयता डॅशबोर्डमध्ये चुकीचे गोपनीयता संकेतक आणि सूचना निर्माण करतो.' या बगमुळे प्रभावित झालेले Android वापरकर्ते त्यांचे व्हॉट्सअॅप अपडेट करून या प्रोब्लेमचे निराकरण करू शकतात. 

एका वारकर्त्याने त्याच्या Pixel 7 Pro वर WhatsApp च्या मायक्रोफोन क्रियाकलापाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. मेटा-मालकीच्या कंपनीने असेही सुचवले आहे की, बग प्रत्यक्षात Android च्या गोपनीयता डॅशबोर्डवर आहे जो चुकीची माहिती देत ​​आहे. या संदर्भात व्हॉट्सअॅपने सांगितले की, त्यांनी गुगलला चौकशी करून समस्येचे निराकरण करण्यास सांगितले आहे. हा प्रोब्लेम आता सोडवण्यात आला आहे.

Web Title: is whatsapp spying on you google clarifies android bug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.