शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

ICC World Cup 2019 : भारतीय क्रिकेट संघावरून गुगलने मागितली माफी; वाचा कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 7:54 AM

विराट कोहलीने चाहत्यांचे आभार मानले होते.

वर्ल्ड कपची सारेच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. भारतासह जगभरात वर्ल्ड कपचा फिवर चढू लागला असून या लाटेचा फायदा उचलण्यासाठी प्रत्येक ब्रांड काही ना काही करत आहे. यामुळे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेली कंपनी गुगलनेही काहीतरी वेगळे करण्याचे ठरविले होते. क्रिकेटसाठीच्या बाजारात भारत पहिला असल्याने गुगलने भारतीय चाहत्यांसाठी कप्तान विराट कोहलीचा व्हिडिओ पाठवलाही. मात्र, झाले भतलेच. यावरून गुगलला माफी मागावी लागली आहे. 

यंदाचा वर्ल्ड कप सुरु होण्याआधी गुगलने हे केले होते. गुगलचे व्हिडिओ कॉलिंग अॅप  Duo वर भारतीय चाहत्यांसाठी एक विशेष संदेश पाठविण्यात आला होता. यामध्ये विराट कोहलीने चाहत्यांचे आभार मानले होते. तसेच टीम इंडियाला पाठिंबा देत रहा असेही या व्हिडीओमध्ये म्हटले होते. मात्र, हा व्हिडीओ केवळ भारतीय संघाच्या चाहत्यांनाच पाठवायचा होता. तो इतर संघांच्या चाहत्यांनाही गेल्याने गुगलवर मोठी नामुष्की ओढवली. एका अहवालानुसार अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंडचे चाहते यामुळे खूश नव्हते. त्यांनी गुगलकडे माफी मागावी, अशी मागणी केली होती. 

यानुसार गुगलने त्यांच्या एका फोरम वेबसाईटवर माफी मागितली आहे. Google Duo च्या काही युजर्सना गुगलचा एक व्हिडीओ चुकीने पाठवला गेला. ही जाहीरात नव्हती. भारतीय युजर्सना हा व्हिडीओ पाठवायचा होता. हे Duo चे प्रमोशन करण्याचा एक भाग होता. कोणत्याही प्रकारची भावना दुखावली गेल्यास किंवा गैरसमज निर्माण झाल्या माफी मागतो, असा संदेश लिहिला आहे. 

गुगलने असे का झाले याचे कारण जरी सांगितले नसले तरीही एका छोट्या चुकीमुळे या व्हिडीओचे लक्ष्य चुकल्याने सर्वांना गेला आहे. गुगलकडे याबाबतच्या तक्रारी आल्यानंतरच माफी मागावी लागल्याचे समजते. 

टॅग्स :ICC World Cup 2019वर्ल्ड कप 2019googleगुगलTeam Indiaभारतीय क्रिकेट संघVirat Kohliविराट कोहली