शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

WhatsApp ला हॅकिंगचा धोका; त्वरित अ‍ॅक्टिव्हेट करा 'हे' सिक्यॉरिटी फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 12:38 IST

सिक्यॉरिटी फीचर्स अ‍ॅक्टिव्हेट करून या हॅकिंगपासून बचाव करता येतो. कसं ते जाणून घेऊया. 

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने जगभरात कोट्यावधी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपला हॅकिंगचा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. Pegasus स्पायवेअरशी संबंधित अनेक प्रकरणं समोर आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे. फोन हॅकिंगचे प्रमाण आता वाढले आहे. सिक्यॉरिटी फीचर्स अ‍ॅक्टिव्हेट करून या हॅकिंगपासून बचाव करता येतो. कसं ते जाणून घेऊया. 

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या सुरक्षिततेसाठी कंपनीने काही महिन्यांपूर्वी 'Fingerprint Lock Feature' आणलं आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स व्हॉट्सअ‍ॅप लॉक अथवा अनलॉक करू शकतात. काही दिवसांपूर्वी WABetaInfo ने ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.221 मध्ये ही नवीन फिंगरप्रिंट लॉकची सुविधा उपलब्ध आहे. तसेच हे व्हर्जन उपलब्ध झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगच्या प्रायव्हसीमध्ये जाऊन युजर्सना 'ऑथेंटिकेशन' चे नवीन ऑप्शन उपलब्ध आहे. यानंतर युजर्स आपले फिंगरप्रिंट येथे रजिस्टर करू शकणार आहेत. 

Whatsapp's New Feature : व्हॉट्सअ‍ॅप आणणार 'मिस्टर इंडिया' फीचर; जाणून घ्या खास बात!

WhatsApp स्टेटसमधले फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करायचेत? कसं ते जाणून घ्या

अँड्रॉईड बीटापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने हे फिचर्स आयओएसला उपलब्ध करुन दिले आहे. त्याचप्रमाणे तीन महिन्यानंतर आयओएस युजर्सना व्हॉट्सअ‍ॅप सुरक्षितेसाठी फेस आयडी व टच आयडीची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. तसेच व्हॉट्सअ‍ॅपचे कोणतेही नवीन फीचर्स येणार असेल तर ते सर्वात प्रथम अँड्रॉइड युजर्सला उपलब्ध केलं जातं. त्यानंतर आयओएस युजर्सला ते फीचर दिलं जातं. फिंगरप्रिंट लॉकसोबतच आणखी एक सिक्यॉरिटी फीचर कंपनीने युजर्सना दिलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपने नुकतीच नव्या पद्धतीची टू-स्टेप व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू केली आहे. हा नवा पर्याय व्हॉट्सअ‍ॅपच्या विंडोज बीटा व अँड्रॉईड अ‍ॅप यूजर्ससाठी असून यामुळे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट अजूनही सुरक्षित होत आहे. 

Whatsapp Web वरचे 'हे' खास फीचर्स माहीत आहेत का?

मस्तच! WhatsApp चं हटके फीचर; कॉल चालू असताना वाचता येणार मेसेज

टू-स्टेप ऑथेंटिकेशन फीचरमुळे व्हॉटसअ‍ॅप अधिक सुरक्षित होणार असून या सुविधेत युजर्सला फोन क्रमांक देऊन ठेवायचा. आणि सोबत एक पिन जोडायचा असतो. व्हॉटसअ‍ॅप ठराविक कालावधीनंतर युजर्सना हा पिन विचारेल. त्यामुळे  फोनवर परवानगीशिवाय (दिलेल्या पिनशिवाय) व्हॉटसअ‍ॅप इंस्टॉल करणे शक्य होणार नाही. यासाठी Menu > Settings > Account > 2 Step Verification मध्ये जाणं महत्त्वाचं आहे. या दोन्ही सिक्यॉरिटी फीचरचा वापर करून व्हॉटसअ‍ॅप अधिक सुरक्षित ठेवता येतं. 

'या' बातम्या ही नक्की वाचा

WhatsApp वरच्या सीक्रेट गोष्टी Gmail वर करता येतात सेव्ह, कसं ते जाणून घ्या

China Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे Apple चं मोठं नुकसान; जाणून घ्या कसं

Google Payमध्ये आला नवा बग, आपोआप डिलीट होतायत बँक खाती

Facebook वरून डिलीट करा ब्राऊजिंग हिस्ट्री; कसं ते जाणून घ्या

गुगल Tiktok ची 'टांग' खेचणार; छोट्या व्हिडीओंसाठी अ‍ॅप आणले

Google Maps ला एका कलाकाराने हॅक केले; कोंडी दिसल्याने वाहतूकच वळली

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडियाMobileमोबाइल