Google Payमध्ये आला नवा बग, आपोआप डिलीट होतायत बँक खाती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 08:58 PM2020-02-04T20:58:41+5:302020-02-04T20:59:30+5:30

डिजिटल पेमेंटसाठी भारतात मोठ्या प्रमाणात गुगल पे हे अ‍ॅप वापरलं जातं.

google pay faces an outage india removed bank accounts | Google Payमध्ये आला नवा बग, आपोआप डिलीट होतायत बँक खाती

Google Payमध्ये आला नवा बग, आपोआप डिलीट होतायत बँक खाती

googlenewsNext

नवी दिल्लीः डिजिटल पेमेंटसाठी भारतात मोठ्या प्रमाणात गुगल पे हे अ‍ॅप वापरलं जातं. पण या गुगल पे अ‍ॅपमध्येही एक बग आलेला आहे. त्यामुळे बँक खातं आपोआप डिलीट होत आहे. गुगल पेच्या या बगमुळे पैसे पाठवणं आणि मिळवण्यात अडचणी येत आहेत. अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून याची तक्रार केली आहे. 

ट्विटरच्या तक्रारीनुसार, अनेक लोकांना गुगल पे अ‍ॅपमध्ये बँक खातं दिसत नाही आहे. त्यामुळे गुगल पे अ‍ॅप पुन्हा एकदा बँक खातं लिंक करण्यास सांगत आहे. विशेष म्हणजे ज्या लोकांनी तक्रार केल्या आहेत, त्यातील जास्त करून लोकांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाती आहेत.

परंतु ही समस्या फक्त अँड्रॉइडच्या एका विशिष्ट व्हर्जनमध्ये येते आहे की आयफोनमध्ये अशा तक्रारी आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आयफोन तपासल्यानंतर त्यात कोणतीही त्रुटी नसल्याचं आढळून आलं आहे. या बगला आता फिक्स्ड करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतातल्या गुगल पे युजर्सची संख्या 6.7 कोटींच्या घरात पोहोचली होती. भारतात गुगल पेनं फोन पेला मागे टाकलं आहे. गुगल पेवरून भारतात दरवर्षी जवळपास 7,82,800 कोटी रुपयांचे व्यवहार होतात. 

Web Title: google pay faces an outage india removed bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.