Whatsapp's New Feature : व्हॉट्सअ‍ॅप आणणार 'मिस्टर इंडिया' फीचर; जाणून घ्या खास बात!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 11:37 AM2020-01-20T11:37:37+5:302020-01-20T11:49:12+5:30

Whatsapp's New Feature : व्हॉट्सअ‍ॅप एका भन्नाट फीचरवर काम करत आहे.

WhatsApp Adding a New 'Disappearing Messages' Feature Soon | Whatsapp's New Feature : व्हॉट्सअ‍ॅप आणणार 'मिस्टर इंडिया' फीचर; जाणून घ्या खास बात!

Whatsapp's New Feature : व्हॉट्सअ‍ॅप आणणार 'मिस्टर इंडिया' फीचर; जाणून घ्या खास बात!

Next
ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅप एका भन्नाट फीचरवर काम करत आहे.डिसअ‍ॅपेरिंग मेसेज असं या नव्या फीचरचं नाव असून यामध्ये मेसेजचा वेळ ठरवता येणार आहे.पाठवलेला मेसेज किती वेळ दिसेल याची वेळ पाठवणाऱ्याला ठरवता येणार आहे.

नवी दिल्ली - लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने नवीन वर्षात आपल्या युजर्ससाठी काही दमदार फीचर्स आणले आहेत. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवरच्या चॅटींगची गंमत आणखी वाढणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. असंच एक भन्नाट फीचर व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आणणार आहे. डिसअ‍ॅपेरिंग मेसेज असं या नव्या फीचरचं नाव असून यामध्ये मेसेजचा वेळ ठरवता येणार आहे. 

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप एका भन्नाट फीचरवर काम करत आहे. यामध्ये पाठवलेला मेसेज किती वेळ दिसेल याची वेळ पाठवणाऱ्याला ठरवता येणार आहे. म्हणजेच एखाद्याने मेसेज केला तर त्या मेसेजचे आयुष्य ठरवता येणार आहे. ही वेळ संपल्यानंतर चॅट आपोआप डिलीट होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच डिसअ‍ॅपेरिंग हे फीचर देण्यात येणार आहे. हे सिलेक्ट केल्यावर सर्व चॅट गायब होणार आहे. टेलिग्राम अ‍ॅपवर हे फीचर आधीपासूनच उपलब्ध आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या पाठविलेले मेसेज हे पाठवणाऱ्याकडून डिलीट करता येतात. यावेळी मेसेज डिलिटेड असे दिसते. परंतू नव्या फीचरमध्ये हे दिसणार नाही. टाईम एक्स्पायर असे दिसण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आणखी एक खूशखबर आहे कारण व्हॉट्सअ‍ॅपने एक जबरदस्त फीचर आणलं आहे. कॉल वेटिंग हे नवं फीचर देण्यात आलं असून यामध्ये कॉलच्या दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करता येणार आहे. कंपनीने आयओएस व्हर्जनसाठी हे खास फीचर रोलआऊट केले आहे. तसेच अपडेटमध्ये चॅट स्क्रीनही अधिक चांगली देण्यात आली आहे. 

whatsapp is banning groups with malicious names and all its members | ...म्हणून WhatsApp करतंय युजर्सना बॅन

WhatsApp स्टेटसमधले फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करायचेत? कसं ते जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स ऑडिओ कॉल दरम्यान वेटिंग कॉल उचलू शकतात. कॉलिंगला महत्त्व देणाऱ्या युजर्ससाठी ही सुविधा फायदेशीर असणार आहे. या फीचरच्या मदतीने वेटिंग कॉल कट करण्याची तसेच सुरू असलेला कॉल थांबवून नवा कॉल रिसीव्ह करता येणार आहे. एका ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅप लॉग इन असेल तर ते लॉग आऊट केल्याशिवाय दुसरीकडे लॉग इन करता येत नाही. मात्र आता एकाच वेळी अनेक ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅप चालणार आहे म्हणजेच अनेक ठिकाणी लॉग इन करता येणार आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅप मल्टिपल डिव्हाईस सपोर्ट फीचरवर काम करत आहे. आयफोन युजर्ससाठी रजिस्ट्रेशन नोटिफिकेशन फीचर रोलआऊट केलं आहे. 


whatsapp rolls out registraion notification feature | चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, आता एकाच वेळी अनेक ठिकाणी WhatsApp चालणार 

'या' बातम्याही नक्की वाचा

Airtel Plan : एअरटेलच्या 'या' प्रीपेड प्लॅनवर मिळणार 2 लाखांचा विमा आणि बरंच काही...

Whatsapp Web वरचे 'हे' खास फीचर्स माहीत आहेत का?

Instagram टिकटॉकला टक्कर देणार, बुमरँगमध्ये नवीन फीचर्स मिळणार

आता स्मार्टफोनला करा टीव्हीचा रिमोट; कसं ते जाणून घ्या

जगातील सर्वात छोटा 3G स्मार्टफोन लाँच; वजन फक्त 31 ग्रॅम, जाणून घ्या खासियत

 

Web Title: WhatsApp Adding a New 'Disappearing Messages' Feature Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.