whatsapp web has four interesting features for you this is how to use | Whatsapp Web वरचे 'हे' खास फीचर्स माहीत आहेत का?
Whatsapp Web वरचे 'हे' खास फीचर्स माहीत आहेत का?

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर हा केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या प्लॅटफॉर्मचं एक वेब-फ्रेंडली व्हर्जन 2015 मध्ये लाँच केलं होतं. व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या मदतीने युजर्स डेस्कटॉपवर मेसेजिंग सर्व्हिसचा वापर करू शकतात. वेब व्हर्जनवर व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलची सुविधा उपलब्ध नसली तरी अनेक खास फीचर्स देण्यात आले आहे. मात्र अनेकांना याबाबत माहिती नाही. अशाच काही खास फीचर्सबाबत जाणून घेऊया.

एकाचवेळी दोन अकाऊंटचा वापर करा

गुगल क्रोममध्ये व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करत असाल तर एकाच वेळी दोन अकाऊंट सुरू करण्याचा पर्याय मिळतो. एक अकाऊंट युजर्स नॉर्मल मोडमध्ये सुरू करू शकतात. तर दुसरं अकाऊंट क्रोमच्या इनकॉग्निटो मोडमध्ये सुरू करता येते. 

इमोजी शॉर्टकट

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर नवीन इमोजी आयकॉन टेक्स्ट बारच्या बाजूला मिळतो. यावर क्लिक केल्यास व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध असलेल्या सर्व इमोजीची लायब्ररी ओपन होते. तसेच इमोजी ट्रे ओपन न करता इमोजीसाठी एक शॉर्टकटही आहे. यासाठी फक्त कॉलन लावून इमोजीचे पहिले लेटर टाईप करावे लागेल. उदा. sad इमोजी पाठवायचा असल्यास :sa असं लिहा. 

पिक्चर-इन-पिक्चर (PiP) मोड

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर येणारे व्हिडीओ पाहण्यासाठी एक मोठी विंडो ओपन होते. ज्यामध्ये तो व्हिडीओ प्ले होतो. मात्र हे फीचर आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप वेबवर येणारे व्हिडीओ हे एका वेगळ्या बॉक्समध्ये प्ले होतात. ज्यामुळे व्हिडीओ पाहत चॅट देखील करता येते. 

टूलकिट एक्सटेन्शन

ब्राऊजरमध्ये टूलकिट एक्सटेन्शनचा वापर केल्यास अनेक खास फीचर्स हे व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी मिळतात. बॅकग्राऊंड नोटिफिकेशन फीचरच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप वेबचा टॅब ओपन करता आलेले मेसेज वाचू शकता. यासाठी फक्त पॉईंटर एक्सटेन्शन आयकॉनवर नेणे गरजेचे आहे. 

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण व्हॉट्सअ‍ॅपने आणखी एक भन्नाट फीचर आणलं आहे. कॉल वेटिंग हे नवं फीचर देण्यात आलं असून यामध्ये कॉलच्या दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करता येणार आहे. कंपनीने आयओएस व्हर्जनसाठी हे खास फीचर रोलआऊट केले आहे. तसेच अपडेटमध्ये चॅट स्क्रीनही अधिक चांगली देण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स ऑडिओ कॉल दरम्यान वेटिंग कॉल उचलू शकतात. कॉलिंगला महत्त्व देणाऱ्या युजर्ससाठी ही सुविधा फायदेशीर असणार आहे. या फीचरच्या मदतीने वेटिंग कॉल कट करण्याची तसेच सुरू असलेला कॉल थांबवून नवा कॉल रिसीव्ह करता येणार आहे.

या' बातम्याही नक्की वाचा

नववर्षात गिफ्ट देणाऱ्या ई-मेलपासून राहा सावध, अन्यथा...

आता स्मार्टफोनला करा टीव्हीचा रिमोट; कसं ते जाणून घ्या

जगातील सर्वात छोटा 3G स्मार्टफोन लाँच; वजन फक्त 31 ग्रॅम, जाणून घ्या खासियत

Google Maps पार्किंग स्पेस शोधण्यास मदत करणार; फॉलो करा सोप्या स्टेप्स... 

लय भारी! युजर्सच्या प्रायव्हसीसाठी फेसबुकने आणले 'हे' 4 दमदार फीचर्स

 

Web Title: whatsapp web has four interesting features for you this is how to use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.