108MP कॅमेरा असलेला सुंदर 5G Smartphone लाँच; किंमतही खिशाला परवडणारी  

By सिद्धेश जाधव | Published: February 23, 2022 01:08 PM2022-02-23T13:08:45+5:302022-02-23T13:09:16+5:30

Hisense Infinity H60 5G: स्मार्ट टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक डिवाइस बनवणारी Hisense कंपनीनं स्मार्टफोन सेगमेंटमध्ये पदार्पण केलं आहे.  

Hisense infinity h60 5g smartphone with 108mp camera launched check price and features  | 108MP कॅमेरा असलेला सुंदर 5G Smartphone लाँच; किंमतही खिशाला परवडणारी  

108MP कॅमेरा असलेला सुंदर 5G Smartphone लाँच; किंमतही खिशाला परवडणारी  

Next

Hisense नं चीनमध्ये आपला पहिला स्मार्टफोन सादर केला आहे. यात 108MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात कर्व्ड डिस्प्ले, 3D लेदर बॅक असे स्पेक्स देखील देण्यात आले आहेत. इन-डिस्प्ले फिंगरप्रिं सेन्सरसह आलेला हा फोन सुंदर निळ्या रंगात विकत घेता येईल. कंपनीनं स्मार्टफोनची किंमत मात्र सांगितली नाही. तसेच भारतात हा फोन येईल कि नाही याची देखील शंका आहे.  

Hisense Infinity H60 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स 

या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या कर्व  डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. यात यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 800 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 8GB पर्यंतचा RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळते.  

फोनच्या मागे बॅक मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो. यात 108MP चा मुख्य कॅमेरा आहे. तसेच या फोनमध्ये 5MP चा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 4,200mAh ची बॅटरी मिळते जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फोनची किंमत 20,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये असू शकते.  

हे देखील वाचा:

Web Title: Hisense infinity h60 5g smartphone with 108mp camera launched check price and features 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.