Google Wallet ने आणलं भन्नाट फिचर; आता ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 11:05 PM2023-12-21T23:05:13+5:302023-12-21T23:06:28+5:30

नेटवर्क नसलेल्या ठिकाणी काम करणाऱ्यांना या सिस्टीमचा होणार फायदा

Google Wallet will work without an internet connection for online payment | Google Wallet ने आणलं भन्नाट फिचर; आता ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही!

Google Wallet ने आणलं भन्नाट फिचर; आता ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही!

Google Wallet Online Payment : कोरोना आणि नोटाबंदीनंतर देशात ऑनलाइन पेमेंटचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन देण्यात 4G आणि 5G तंत्रज्ञानाचाही मोठा वाटा आहे. त्यामुळेच वापरकर्ते त्यांच्या वॉलेटमधून किंवा खात्यातून लाखो रुपयांचे व्यवहार इंटरनेटच्या मदतीने झटपट करू शकतात. पण आता जर तुम्हाला सांगितले गेले की आता ऑनलाइन पेमेंटसाठी इंटरनेटची आवश्यकता नाही आणि तुम्ही इंटरनेटशिवाय आर्थिक व्यवहार करू शकाल. तुम्हाला कदाचित हा एखादा जोक वाटेल, पण आता इंटरनेटची गरज भासणार नाही हे अगदी खरे आहे. यासाठी गुगल वॉलेट ( Google Wallet ) ने एक नवीन सुविधा सुरू केली आहे, ज्याबद्दल जाणून घेऊया.

ऑनलाइन पेमेंटसाठी इंटरनेटची आवश्यकता का नाही?

गुगलने नुकतीच कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीम सादर केली आहे, ज्यामध्ये गुगल वॉलेट व्हर्च्युअल कार्ड पेमेंटशी जोडले जाईल. या तंत्रज्ञानाच्या मदतीने, तुम्हाला Google Wallet द्वारे पेमेंट करण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नसेल. तुमचे कार्ड वॉलेटशी जोडण्यासाठी तुम्हाला एकदा सुरूवातीला इंटरनेटची आवश्यकता असेल, पण त्यानंतर तुम्ही एका साध्या टॅप वर ऑनलाइन पेमेंट करू शकाल.

ही यंत्रणा कशी काम करेल?

कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीममध्ये, तुम्ही तुमचे Google Wallet उघडताच, तुम्हाला डीफॉल्ट व्हर्च्युअल कार्ड दिसेल. तुम्ही त्यावर टॅप करताच, कार्डचे तपशील रीडरच्या मदतीने NFC सिग्नल रीडरपर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला जे पेमेंट करायचे आहे ते पूर्ण होईल. या तंत्रज्ञानाद्वारे, तुम्ही ऑफलाइन मोडमध्ये देखील पेमेंट करू शकता.

...पण एक आहे अडचण 

कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीम मध्ये जर तुम्ही बराच काळ ऑफलाइन असाल तर तुम्हाला पेमेंट करण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणून, जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हा तुमचे इंटरनेट किती काळ सक्रिय होते, याची नक्की खात्री करून घ्या, असा सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: Google Wallet will work without an internet connection for online payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.