Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?

शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?

Share Market :देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. ४ जून रोजी लोकसभेचा निकाल समोर येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये बदल दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 04:45 PM2024-05-27T16:45:44+5:302024-05-27T16:53:12+5:30

Share Market :देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. ४ जून रोजी लोकसभेचा निकाल समोर येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये बदल दिसत आहेत.

If the BJP government does not come to power on June 4 stock market will fall What will be the status? | शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?

शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?

Share Market ( Marathi News ) : देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. शेवटचे सातव्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकांचा शेअर मार्केटवरही परिणाम दिसत आहे. शेअर बाजाराने आज नवा उच्चांक  गाठला. आर्थिक आणि धातू समभागांच्या पार्श्वभूमीवर, बीएसई सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी वाढून ७५,९४९.३० अंकांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. निफ्टी ५० निर्देशांक देखील १०० हून अधिक अंकांनी वाढला आणि २३,०९२ अंकांच् जवळ पोहोचला. पण लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास शेअर बाजारात मोठी घसरण होऊ शकते, असं जाणकारांचे म्हणणे आहे.

जर ४ जूनचे निकाल भाजपच्या नेतृत्वाखालील NDA च्या बाजूने आले नाहीत, तर इक्विटी मूल्यांकन २०१४ पूर्वीच्या पातळीवर जाऊ शकते.

लोकसभा निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले नाहीत तर त्याचा शेअर बाजारावर परिणाम होतील, असं जाणकारांचे मत आहे.  राजकीय अस्थिरता आणि धोरणाच्या भीतीमुळे बाजारभावावर परिणाम होईल. ऐतिहासिकदृष्ट्या, निवडणुकीच्या निकालांमुळे जेव्हा जेव्हा बाजारात घसरण होते, तेव्हा बाजार पुन्हा सावरायला मध्यम ते दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. याचे कारण बाजार आणि कंपन्यांना नवीन सरकारच्या धोरणांशी जुळवून घेण्यास वेळ लागतो.

या निवडणुकांमध्ये भाजपने आपले एकहाती बहुमत राखले तर सरकारची धोरणे कायम राहतील, असा विश्वास मार्केटमध्ये आहे. निर्गुंतवणूक, जमीन विधेयक आणि समान नागरी संहिता यावर चर्चा पुढे जाऊ शकते. एकूणच, वित्तीय बाजार सकारात्मक राहील.

जर भाजप एकटा पक्ष बहुमत मिळवण्यात अपयशी ठरला आणि एनडीएतील इतर पक्षांसह सरकार स्थापन केले, तर धोरणात्मक स्थिरतेवरुन मार्केटमध्ये नकारात्मक प्रभाव पडेल. अशा स्थितीत आघाडीतील इतर पक्षांकडून दबाव वाढू शकतो पण एकूणच स्थिरता कायम राहू शकते. याचा आर्थिक बाजारावर संमिश्र परिणाम होऊ शकतो.

एनडीए बहुमताचा आकडा गाठू शकला नाही आणि कुणालाही बहुमत मिळाले नाही तर बाजारात अनिश्चितता वाढू शकते. मजबूत सरकार नसेलतर निर्णय घेण्यास उशीर झाल्यास सुधारणांवर परिणाम होऊ शकतो. जर इंडिया आघाडीने सरकार बनवले तरीही शेअर मार्केटवर परिणाम होऊ शकतो.

Web Title: If the BJP government does not come to power on June 4 stock market will fall What will be the status?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.