७५ रुपयांच्या शेअरचा धमाका! ₹१.२० लाखाचे झाले ₹३८ लाख, १० महिन्यांत दिला ३१००% परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 03:17 PM2024-06-15T15:17:59+5:302024-06-15T15:23:49+5:30

कंपनीचा शेअर गेल्या १० महिन्यांत ३१०० टक्क्यांहून अधिकने वधारले आहेत.

शेअर बाजारातील बोंडाडा इंजिनिअरिंगच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ १० महिन्यांत मालामाल केले आहे. कंपनीचा शेअर शुक्रवारी ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह २४३६.८० रुपयांवर बंद झाला.

बोंडाडा इंजिनिअरिंगचा आयपीओ ऑगस्ट २०२३ मध्ये आला होता. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ७५ रुपये एवढी होती. कंपनीचा शेअर गेल्या १० महिन्यांत ३१०० टक्क्यांहून अधिकने वधारले आहेत. महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या शेअरने १४ जूनला आपला नवा उच्चांक नोंदवला आहे.

१.२० लाखाचे केले ३८ लाख रुपये - बोंडाडा इंजिनिअरिंगचा आयपीओ १८ ऑगस्ट २०२३ ला खुला झाला होता. तो २२ ऑगस्टपर्यंत खुला होता. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना केवळ एका लॉटसाठीच गुंतवणूक करता येत होती. आयपीओच्या एका लॉटमध्ये १६०० शेअर होते. अर्थात, रिटेल इन्व्हेस्टर्सना या आयपीओमध्ये १२०००० रुपयांची गुंतवणूक करावी लागली.

महत्वाचे म्हणजे, ज्या गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये मिळालेले शेअर अद्यापर्यंत आपल्याकडेच ठेवले आहेत, त्यांना जबरदस्त फायदा झाला आहे. बोंडाडा इंजिनिअरिंगचा शेअर शुक्रवारी १४ जूनला २४३६.८० रुपयांवर बंद झाला. शेअरच्या सध्याच्या किंमतीनुसार, १६०० शेअर्सचे मूल्य आता ३८.९७ लाख रुपये झाले आहे.

६ महिन्यांत ५००% परतावा - बोंडाडा इंजिनिअरिंगचा शेअर गेल्या ६ महिन्यांत ५००% हून अधिक वधारला आहे. १५ डिसेंबर २०२३ रोजी मल्टीबॅगर कंपनीचा शेअर ४०३.३० रुपयांवर होता. जो १४ जून २०२४ रोजी २४३६.८० रुपयांवर बंद झाला.

या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ४८४% ची तेजी दिसून आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे, १ जानेवारीला कंपनीचा शेअर ४१७.१० रुपयांवर होते. ज्या १४ जून २०२४ रोजी २४०० रुपयांचा टप्पा ओलांडला. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांक १४२.५० रुपये एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)