राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 04:31 PM2024-05-27T16:31:49+5:302024-05-27T16:33:15+5:30

Lok Sabha Election 2024: आज बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा सुरू असताना एक मोठी दुर्घटना घडली. राहुल गांधी हे मंचावर उपस्थित असतानाच सभेसाठी बांधलेला मंच तुटून कोसळला.

Lok Sabha Election 2024: The stage collapsed in Rahul Gandhi's meeting, the leaders were in chaos | राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेही इंडिया आघाडीसाठी आघाडीवर राहून प्रचार करत आहेत. दरम्यान, आज बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांची सभा सुरू असताना एक मोठी दुर्घटना घडली. राहुल गांधी हे मंचावर उपस्थित असतानाच सभेसाठी बांधलेला मंच तुटून कोसळला. या सभेसाठी आरजेडीचे नेते तेजस्वी यादव, व्हीआयपीचे मुकेश सहनी आणि भाकपचे दीपांकर भट्टाचार्य उपस्थित होते. मात्र मोडलेल्या मंचाची दुरुस्ती करून सभा पुन्हा सुरू करण्यात आली. 

या सभेला संबोधित करताना तेजस्वी यादव म्हणाले की, १७ महिन्यांमध्ये आम्ही जे काम केलं, तेवढं काम  मुख्यमंत्र्यांना १७ वर्षांमध्येही करता येणार नाही. नरेंद्र मोदी २०१४ मध्ये आले, आता २०२४ मध्ये जातील, असे नितीश कुमार म्हणाले होते. हे लोक गरीब आणि आरक्षणाबाबत बोलणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याची धमकी देत आहेत, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे. 

दरम्यान, जेडीयूने राहुल गांधींच्या बिहार दौऱ्यावर टीका केली आहे. जेडीयूचे मुख्य प्रवक्ते के.सी. त्यागी म्हणाले की, काँग्रेस मागच्या ३०-३५ वर्षांपासून बिहारमध्ये अनुपस्थित आहे. आरजेडीच्या छत्रछायेमध्ये काँग्रेस वाढत आहे. मागच्या वेळी काँग्रेसला ज्या जागा देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आरजेडीच्या अपेक्षेनुरूप निकाल आले नव्हते. मात्र काँग्रेस ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. काँग्रेस जागा वाढवून घेऊन नेत्यांच्या नातेवाईकांमध्ये आरक्षित करतात. नेहरू, गांधी आणि पटेल यांचा जो वारसा होता, तो संपुष्टात आला आहे. तसेत सदाकत आश्रम हा राजकीय शरणार्थींचा अड्डा बनला आहे, असा आरोपही त्यागी यांनी केला.  

Web Title: Lok Sabha Election 2024: The stage collapsed in Rahul Gandhi's meeting, the leaders were in chaos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.