प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 04:50 PM2024-05-27T16:50:07+5:302024-05-27T16:54:17+5:30

प्रेमात धोका देऊन पळ काढणाऱ्या प्रियकराला प्रेयसीने चांगलेच अडचणीत आणले.

 In Bihar's Poornaiya district, a cheating lover was beaten to death by his girlfriend | प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप

प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप

प्रेमात धोका देऊन पळ काढणाऱ्या प्रियकराला प्रेयसीने चांगलेच अडचणीत आणले. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. संबंधित तरूणीने तरूणाला पकडून ठेवले आणि हाच आपला पती असल्याचा दावा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या दोघांना ताब्यात घेतले. तरूणीने सांगितले की, हा तरूण तिचा पती असून त्यांनी जिल्ह्यातील आस्था मंदिरात सातफेरे घेतले आहेत. खरे तर तरूणाने लग्न केल्यानंतर ऑटो आणतो हा बहाणा सांगून तिथून पळ काढला. यानंतर संबंधित तरूणी त्याला शोधत राहिली. ती इतरत्र शोधत असताना तिला तेथील झिरो माईलजवळ तो फोनवर बोलताना सापडला. तरुण फोनवर बोलत असल्याचे पाहून तरुणीने त्याला पकडून लग्नाचा संपूर्ण व्हिडीओ आणि फोटो दाखवले. 

तरूणी ममताने सांगितले की, ती अनुसूचित जातीची आहे. पण मुलाने सांगितले होते की, प्रेमात जात आणि धर्म पाहिला जात नाही. मग त्या दोघांमधील संवाद वाढला आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांमधील संपर्क वाढला आणि दोघांची भेट होऊ लागली. तसेच याच काळात संबंधित तरूणी गरोदर देखील राहिली पण लग्न आणि समाजाच्या भीतीमुळे तिने गर्भपात केला असल्याचा खुलासा केला. दरम्यान, तरूणासोबत आधीच लग्न झाले असल्याचा दावा पीडित तरूणीने केला. 

पीडित मुलीने आणखी सांगितले की, मुलाच्या अशा वागण्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तरुण आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुलाचे हे कृत्य पाहून कुटुंबीयांनी घाईघाईने तरुणाचे लग्न लावून दिले. हा प्रकार तरुणीला समजल्यानंतर तिने तरुणाचा शोध सुरू केला. ये-जा करताना त्याची वाट बघू लागली. या शोधादरम्यान तरुणीला एके दिवशी तरुण दिसला. त्याला पाहताच तिने आवाज काढला आणि तरुणाला पकडले. यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत मुलीच्या बहिणीच्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.  

Web Title:  In Bihar's Poornaiya district, a cheating lover was beaten to death by his girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.